January 31, 2025 8:01 PM

views 21

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची ३२ पदकांची कमाई

उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत ३२ पदकांची कमाई केली आहे. यात ७ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कास्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदक तालिकेत मणिपूर, संरक्षण दल आणि कर्नाटकनंतर चौथ्या स्थानावर आहे. १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत पार्थ माने याने सुवर्ण पदक तर रुद्रांश पाटीलनं रौप्य पदक पटकावलं. सेना दलाच्या अंकुश जाधव याने या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. खो-खोमध्ये महाराष्ट्राचा पुरुष संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. जलतरणात प्रतिक्षा डांगी, रिषभ दास,...

January 31, 2025 7:19 PM

views 20

राज्यात जीबीएस आजारामुळे ४ जणांचा मृत्यू

गुइलेन बॅरे आजाराचं निदान झालेल्या दोन रुग्णांचा आज पुण्यात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या आता ४  झाली आहे.  आज मृत पावलेल्यांमध्ये एका टॅक्सी चालकाचा आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. राज्यात गुइलेन बॅरे आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या १३० वर पोहोचली असून यापैकी २० रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.

January 31, 2025 3:52 PM

views 20

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला २५ पदकांची कमाई

उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत सर्वाधिक २५ पदकांची कमाई केली आहे. यात ५ सुवर्ण, १२ रौप्य आणि ८ कास्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आज झालेल्या स्पर्धांमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात पुरुष गटात महाराष्ट्राच्या पार्थ माने याने सुवर्ण पदक मिळवलं आहे. तर, रौप्य पदकही महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटील याने मिळवलं आहे. सेना दलाच्या अंकुश जाधव याने या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. काल झालेल्या १० मीटर एअर राय...

January 28, 2025 3:47 PM

views 28

राज्यात एसटी भाडेवाढ विरोधात आंदोलन

एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन झालं.  सिंधुदुर्गमधल्या कुडाळ बसस्थानकात आज सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी एसटीची दरवाढ केली नव्हती पण आता निवडणूक झाल्याबरोबर महायुती सरकारने एसटीची  दरवाढ केली.  ही  दरवाढ रद्द झाली नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी चौकातल्या  एस टी स्टॅन्ड इथं आणि  धुळे बस स्थानकातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष...

January 28, 2025 9:57 AM

views 19

महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे १११ रुग्ण

महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या १११ झाली असून, त्यातले १६ रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. राज्यातली ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. सात सदस्यांच्या या समितीमध्ये राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यामध्ये मदत करेल. याचबरोबर राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही लक्ष ठेवणा...

January 28, 2025 8:58 AM

views 12

येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता

एसटी महामंडळाला येत्या ५ वर्षात स्वमालकीच्या २५ हजार नव्या बस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत दिली. दरम्यान, एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काल ठिकठिकाणी आंदोलन केलं. त्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ गरजेची होती असं स्पष्टीकरण सरनाईक यांनी दिलं आहे. 

January 27, 2025 3:59 PM

views 10

राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या ६ हजारांहून अधिक महाविद्यालयांत "संविधान गौरव महोत्सवा" अंतर्गत विविध उपक्रमाचं आयोजित केले जाणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली.  या महोत्सवात तज्ञांची व्याख्यानं, निबंध, वक्तृत्व, भित्तीपत्रक स्पर्धा, चर्चासत्रांच्या आयोजनासोबतच जनजागृती अभियानही चालवलं जाणार आहे. राज्यघटनेतल्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करणं आणि नागरिकांना त्यांचे घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचं पालन करण्यास...

January 26, 2025 6:13 PM

views 67

राज्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन राज्यात इतरत्रही मोठ्या उत्साहात साजरा झाला.    नवी मुंबईत कळंबोली इथे पोलीस मुख्यालय मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण स्तरावरचं ध्वजारोहण संपन्न झालं. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी तिरंगा फडकावला. या कार्यक्रमाला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह नागरिक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई पोलीस पथकासह विविध पथकांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात अलिबाग इथे पोलीस मैदानावर महिला आणि बालवि...

January 26, 2025 2:41 PM

views 6

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा ७ पद्म विभूषण, १९ पद्म भूषण आणि ११३ पद्म पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.    सुप्रसिद्ध लेखक मारुती चितमपल्ली, अभिनेता अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांवर अल्प दरात उपचार करणारे डॉ. विलास डांगरे, गायिका अश्विनी भिडे, बा...

January 25, 2025 6:46 PM

views 33

राज्यातल्या ४३ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर

  राज्यातल्या ४३ पोलिस अधिकाऱ्यांना विविध शौर्य पदक जाहीर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात पोलिस, गृहरक्षक दल, अग्निशमन, आणि नागरी सेवांसह इतर सुरक्षा सेवांमधल्या ९४२ कर्मचाऱ्यांना विविध पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. यापैकी, ९५ कर्मचाऱ्यांना आपल्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. १०१ कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदकं तर ७४६ कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवा पदकं बहाल केली जाणार आहेत.   राज्यातल्या एकूण ४३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानि...