February 7, 2025 5:23 PM

views 19

वंचित आणि मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कल्याणकारी योजना राबवणार

समाजातल्या वंचित आणि मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे.मात्र या योजनांचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचतो किंवा नाही,याची पाहणी आवश्यक असल्याचं मत राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केलं.वाशिम जिल्ह्यातल्या समाज कल्याण कार्यालयात काल विशेष आढावा बैठक घेतल्यानंतर ते बोलत होते.  

February 7, 2025 5:17 PM

views 23

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण,३८ रौप्य आणि ३७ कास्यपदकांचा समावेश आहे.

February 6, 2025 1:53 PM

views 21

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८५ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८५ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत मात्र महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे. पहिल्या स्थानावर कर्नाटक, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा आणि तिसऱ्या स्थानावर मध्य प्रदेशाचा समावेश आहे. तसंच, हरयाणा, तामिळनाडू, मणिपूर, दिल्ली, केरळ आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे. यजमान उत्तराखंडचा संघ ३३ पदकांसह पदकतालिकेत पंधराव्या स्थानावर आहे.

February 5, 2025 8:18 PM

views 37

येत्या ५ वर्षात सर्वांचं वीज बिल कमी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

येत्या पाच वर्षात वीज बिल कमी करुन सर्व ग्राहकांना दिलासा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. बीडमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. ऊर्जा विभागाने पुढच्या पाच वर्षाचे वीजेचे दर काय असतील, याची पिटीशन दाखल केली. त्यामुळे घरगुती आणि औद्योगिक वीजेचे दर कमी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री सौर कृषी वीज योजनेचं काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होईल, आणि राज्यभरातल्या सर्व शेतकऱ्यांना लागणारा १६ हजार मेगावॅट वीज पुरवठा दिवसा केला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्...

February 5, 2025 8:10 PM

views 15

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र चौथ्या स्थानी घसरला असून मध्य प्रदेशनं १७ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कर्नाटक २८ सुवर्णपदकं जिंकून पहिल्या स्थानावर, तर सेना दल संघ २७ सुवर्णपदकांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. पाचव्या स्थानावर हरयाणाचा संघ आहे. यजमान उत्तराखंडचा संघ ४ सुवर्णपदकांसह पदकतालिकेत पंधराव्या स्थानावर आहे.

February 5, 2025 1:21 PM

views 15

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ७७ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७८ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३४ रौप्य आणि २८ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दल संघाचा समावेश आहे. तसंच, मध्यप्रदेश, तामिळनाडू, मणिपूर, हरियाणा, केरळ, दिल्ली आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे. यजमान उत्तराखंडचा संघ २७ पदकांसह पदकतालिकेत पंधराव्या स्थानावर आहे.  

February 4, 2025 7:49 PM

views 17

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ७३ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ७३ पदकांची कमाई केली आहे. त्यात १५ सुवर्ण, ३२ रौप्य आणि २६ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्राचं तिसरं स्थान कायम असून पहिल्या स्थानावर कर्नाटक तर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा समावेश आहे. तसंच, मणिपूर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघांत समावेश आहे.  

February 3, 2025 3:38 PM

views 37

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २५ रौप्य आणि १७ कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक ५५ पदकं जिंकली आहेत. सेना दल संघाला १८ आणि कर्नाटकला १७ सुवर्णपदकं मिळाली आहेत. मात्र सेना दल संघाला १० रौप्य आणि ८ कांस्य तर कर्नाटकला ९ रौप्य आणि ९ कांस्य पदकं असल्याने सेना दल संघ पदकतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे. तर मणिपूर ११ सुवर्ण पदकांसह चौथ्या तर मध्यप्रदेश ९ सुवर्ण पदकांसह पाचव्या स्थानावर आहे. तामिळनाडू आणि ...

February 2, 2025 8:12 PM

views 20

आदिवासीबहुल भागांमधलं सर्व प्रकारचं मागासलेपण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आदिवासीबहुल भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागसलेपण दूर करणं सर्वांत मोठं आव्हान असून सरकार त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूर मध्ये एम्स इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीनं आयोजित फिस्ट २०२५ या परिषदेच्या उद्घाटनावेळी गडकरी आज बोलत होते.   सेवा आणि उत्पादन क्षेत्राचं जीडीपीमधलं योगदान वाढवण्यासाठी सरकारनं दुर्गम भागांना प्राधान्य दिलं आहे, आदिवासीबहुल भागाच्या सर्वसमा...

February 2, 2025 7:43 PM

views 23

राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश

राज्यात १५ ते १६ वर्ष वयोगटातली ९८ टक्के मुलं शाळेत जात असून शाळाबाह्य मुलांचं प्रमाण सर्वात कमी असलेल्या राज्यांमधे महाराष्ट्राचा समावेश होतो. अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेतर्फे राज्याच्या ग्रामीण भागातल्या शाळांचा सर्वेक्षण अहवाल - असर - प्रकाशित करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. ६ ते १४ वर्ष वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांचं प्रमाण राज्यात ४ दशांश टक्के आहे. देशभरात हे ...