February 17, 2025 8:49 PM

views 21

पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने पहिल्या वरिष्ठ ग्रीको रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ आणि २३फेब्रुवारी रोजी लोणीकंद मधल्या हिंद केसरी मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची मान्यता असलेले ६ महानगरपालिका आणि ३६जिल्हा असे ४२जिल्हा कुस्तीगीर संघ सहभागी होणार आहेत. १० वजन गटांमध्ये सुमारे ४०० कुस्तीगीर या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

February 17, 2025 8:35 PM

views 18

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून, १० मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर करणार आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्चपासून सुरुवात  होणार आहे. पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांचं अभिभाषण होईल.

February 17, 2025 8:43 AM

views 10

राज्यातला साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात

राज्यातला साखर हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे ६१ लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून, १४ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. सर्वाधिक १७ लाख टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झालं; तर पुणे विभागात १४ लाख टन साखर उत्पादित करण्यात आली. यंदा राज्यात ८५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र यंदा गाळप हंगाम नेहमीपेक्षा उशिरा सुरू झाला; त्यातच अतिवृष्टीमुळे राज्यात उसाला तुरे येण्याचं प्रमाणही वाढलं होतं; अशा विविध कारणामुळे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी ह...

February 16, 2025 8:43 AM

views 27

सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम पोलीस दलानं करावं – मुख्यमंत्री

राज्य सरकारच्या वतीनं पोलीस दलाकरीता नवीन कार्यालयं, वाहनं, सीसीटिव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली असून येत्या काळातही सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम राज्यातील पोलीस दल करेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.   पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित ‘तरंग-2025’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल...

February 14, 2025 3:12 PM

views 38

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर ग्रुपची स्थापना

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेची बांधणी आणि पक्षाच्या महत्वाच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोअर ग्रुपची स्थापना केल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं.   उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल राष्ट्रीय, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

February 13, 2025 4:01 PM

views 12

महिला आणि बालविकास विभागात १८,८८२ पदांची भरती

महिला आणि बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५ हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ मदतनीस अशी एकूण १८ हजार ८८२ पदे भरणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात महिला सहकारी संस्था, महिला बचत गट, महिला मंडळ आणि अंगणवाडीबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तसचं भिवंडी शहरात अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढवण्याबाबत काल बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्या बोलत होत्या. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं होणार असून उमेदवारांनी कोणत्याही आ...

February 11, 2025 7:49 PM

views 16

पालघर जिल्ह्यातल्या देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मान्यता

पालघर जिल्ह्यातल्या देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यामुळं चाळीस लाख लोकसंख्येचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सूटणार आहे. यातून वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी ६९ दशलक्ष घनमीटरपेक्षा जास्त आरक्षित असणार आहे.    पुणे जिल्ह्यातल्या दौंड, बारामती आणि पुरंदर तालुक्यातल्या सिंचनासाठीच्या जनाई, शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमध्ये रुपांतर करण्याच्या कामाला आणि त्यासाठीच्या ४३८...

February 11, 2025 7:26 PM

views 27

राज्यात जीबीएसच्या आणखी एकाचा मृत्यू

राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात काल 37 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात या आजाराने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएस रुग्णसंख्या 192 झाली आहे.

February 11, 2025 2:30 PM

views 18

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

महाराष्ट्रात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली. या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. राज्यभरात ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे. परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळानं २७१ भरारी पथकांची नेमणूक केली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅम...

February 10, 2025 7:00 PM

views 15

राज्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला सुरुवात

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रसरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात झाली. पालघर, नांदेड, गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर या ५ जिल्ह्यांतल्या मिळून ३४ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोहिमेचं उद्घाटन दूरदृष्यप्रणालीमार्फत केलं. हा दुर्धर आजार असून तो क्युलेक्स डासांच्या चाव्यामुळे होतो. मोहिमेअंतर्गत दोन वर्षांपेक्षा लहान बालकं, गरोदर माता आणि गंभीर आजारी व्यक्ती वगळता सर्वांना  प्रतिबंधक ग...