March 3, 2025 6:45 PM

views 33

६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर

राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज दोन्ही सभागृहात सादर केल्या. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या मांडल्या. त्यात सर्वाधिक ३ हजार कोटी रुपयांहून अधिक मागण्या ग्रामविकास विभागाच्या आहे. प्रधानमंत्री आवासन योजनेसाठी पावणे ४ हजार कोटी आणि मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजनेसाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद यात आहे. या मागण्यांवर ६ आणि ७ मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे.    विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्व...

March 3, 2025 8:51 AM

views 24

महामार्गांवर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं समाधान

राज्यातल्या महामार्गांवर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित 'परिवहन भवन' इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.   महामार्गांवर स्वयंचलित वाहतुक नियंत्रण यंत्रणा कार्यरत असून, अपघात कमी होण्यात या यंत्रणेचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस म्हणाले. या कार्यक्रमाला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, यांच्...

March 1, 2025 7:19 PM

views 31

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात झाला. विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं. संघभावना जोपासण्यासाठी खेळ खेळणं आवश्यक आहे, त्यामुळे क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलिसांना आपलं कसब दाखवण्याची संधी मिळते असं फडणवीस म्हणाले. या स्पर्धेत १८ क्रीडा प्रकारात २ हजार ९२९ खेळाडूंनी सहभाग घेतला.

February 28, 2025 7:34 PM

views 43

नागरिकांना राज्य सरकारच्या ५०० सेवा व्हॉट्सअपद्वारे मिळणार

राज्य सरकारनं फेसबुक आणि व्हॉट्सअपची प्रवर्तक असलेल्या मेटा या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. याद्वारे व्हॉट्सॲप गव्हर्नन्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या ५०० सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सॲपवर मिळणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. मुंबई टेक वीक २०२५ या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर ते 'गव्हर्निंग द फ्युचर - एआय अँड पब्लिक पॉलिसी' या विषयावर बोलत होते.    एनपीसीआय या जगातल्या सर्वात मोठ्या युपीआय पेमेंट गेटवे कंपनीचे जागतिक मुख्याल...

February 28, 2025 4:04 PM

views 30

योजनांच्या अंमलबजावणीसाठी AIचा वापर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एआयचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. शासनाच्या कृती आराखड्यानुसार होणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. विविध विभाग आणि पातळीवर उत्कृष्ट काम करत असलेल्या १५ विभागांच्या कामांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. नाविन्यपूर्ण काम केलेल्या अधिकारी आणि कार्यालयांचे कौतुक करून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. यात मुंबई...

February 25, 2025 9:15 PM

views 20

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अग्रस्थानी

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत राज्यात २२ हजार १० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत २० हजार प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. यात सर्वाधिक १ हजार ८९५ प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. त्यानंतर अहिल्यानगर, सांगली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. कृषी आयुक्तालयाच्या राज्य नोडल अधिकारी यांच्या कार्यालयानं ही माहिती दिली आहे. यामुळे राज्यात २ हजार २६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३८९ कोटी रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांना द...

February 25, 2025 8:51 AM

views 31

महाराष्ट्र AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्य शासन प्रशासकीय कामकाज आणि अर्थव्यवस्थेला गती देत आहे; महाराष्ट्र लवकरच देशाच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नॅसकॉम तंत्रज्ञान आणि नेतृत्व परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते.   देशातली ६० टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. २०३०पर्यंत राज्यातली ५० टक्के वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल असं फडणवीस म्हणाले. शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतकऱ्यांचं उत्पन...

February 23, 2025 7:47 PM

views 19

काँग्रेसच्या राज्यभरातल्या जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांची उद्या बैठक

काँग्रेसच्या राज्यभरातल्या जिल्हा समित्यांच्या अध्यक्षांची बैठक २४ फेब्रुवारी रोजी आणि प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २५ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आली आहे. या बैठकीत संघटनात्मक बाबींचा आढावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेणार आहेत. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतले पक्षाचे गट नेते सतेज पाटील, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन उपस्थित राहणार आहेत, असं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी...

February 23, 2025 1:52 PM

views 28

महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना

छत्रपती शिवाजी महाराजांंच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचं चार सदस्यीय शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं.  सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.   राज्य शासनानं 'मराठा लष्करी भूप्रदेश' या संकल्पनेअंतर्गत हा प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यां...

February 18, 2025 8:12 PM

views 63

सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्यमंत्रिमंडळाची मान्यता

सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करायला राज्य सरकारनं आज मान्यता दिली. मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.    म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करायला मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार आहे. जळगांव जिल्ह्यातल्या चाळीसगावमधल्या वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या पावणे तेराश...