December 12, 2025 2:56 PM

views 16

भारतात ठीक ठिकाणी आज थंडीची लाट

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर कर्नाटक, ओदिशा, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात आज थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी वातावरणात दाट धुकं राहील. ईशान्य भारतात आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, आणि त्रिपुरा मध्येही अशीच परिस्थिती राहील असा अंदाज आहे.     अंदमान आणि निकोबार द्वीप समूहांवर आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, यावेळी सोसाट्याचे वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.    दरम्यान, दिल्ली पर...

December 11, 2025 7:30 PM

views 32

‘मदत माश’ जमिनींबाबतचं विधेयक विधानसभेतमंजूर

'मदत माश' जमिनींबाबतचं विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर झालं. मराठवाड्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा भागात सुमारे ७० हजार कुटुंबांना या सुधारणेचा फायदा होणार आहे. निजामाच्या राजवटीत इनाम म्हणून मिळालेल्या 'मदत माश' जमिनीवरची घरं भोगवटादारांच्या मालकीची नव्हती. या जमिनींवर कर्ज मिळवता येत नसे, किंवा त्या हस्तांतरित करता येत नसत. अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधेयक मांडताना दिली.   राज्यातल्या देवस्थानांच्या जमिनींबाबत श्वेतपत्रिका काढाव्या अशी मागणी काँग्रेसचे विजय...

December 11, 2025 7:45 PM

views 39

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याची केंद्राकडे २९ हजार कोटी रुपयांची मागणी

राज्यातल्या अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे २९ हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत ४४ हजार कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राची मदत लवकरच मिळण्याची आशा असून दुसरं पाहणी पथक येत्या आठवड्यात येण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले. पुरवमी मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. यानंतर सुमारे 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर झाल्या.    राज्यात वित्तीय शिस्त ठेवण्याचा, उत्पन्नाचे स्त्...

December 10, 2025 7:09 PM

views 25

वाहनांच्या ई-चलानच्या यंत्रणेत बदल करणार, लोक अदालतीतून थकीत दंड वसुलीचाही प्रयत्न

वाढती वाहनसंख्या तसंच ई - चलानच्या यंत्रणेत बदल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. ई चलानची वसुली करण्यासाठी लोक अदालत सारखा उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.   राज्यात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी  येत्या आठ दिवसात करावी आणि शासन निर्णय जारी केल्यापासून वसूल झालेली टोल रक्कम परत करावी, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधान...

December 9, 2025 7:31 PM

views 35

राज्यात गारठा वाढला!

राज्यात बऱ्याच ठिकाणी गारठा वाढला आहे. धुळे शहर आणि जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली असून आज पारा ५ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सीअसपर्यंत घसरला. उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यानं हुडहुडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आज ५ पूर्णांक ९ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक शहरातही पुन्हा थंडी वाढली असून आज सकाळी ९ पूर्णांक ३ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, अहिल्यानगरमध्ये ७ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामातल्या सर्व...

December 9, 2025 7:11 PM

views 99

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणाऱ्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

तुकडेबंदी कायद्यातल्या जाचक अटी शिथिल करणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. यामुळं सर्व जमीन धारकांची नावं सात बाऱ्यावर येतील आणि लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.    या नवीन विधेयकामुळे आता विकास आराखडा किंवा प्रादेशिक आराखडा मंजूर असलेल्या क्षेत्रात वेगळ्या 'एनए' परवानगीची गरज भासणार नाही. त्याऐवजी 'एक वेळचे अधिमूल्य'  भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल, असं या विधेयकात स्पष्ट करण्यात आले आहे.   सार्वजनिक विश्वस्त कायद्यात बद...

December 8, 2025 6:26 PM

views 174

Winter Session: पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू झालं. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारनं आज ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या.   शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दोन्ही सभागृहात आज वंदे मातरमचं सामूहिक गायन झालं. त्यानंतर तालिका अध्यक्षांची नियुक्ती झाली. काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी हे अधिवेशन वाढवून देण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत असून कामकाज घ...

December 7, 2025 8:21 PM

views 30

‘राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची, मात्र दिवाळखोरीकडे वाटचाल नाही’

राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली, तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेलं नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकला. त्यांची पत्रकार परिषद निराशेनं भरलेली आणि त्रागा करणारी होती, अशी टीका त्यांनी केली. राज्यातल्या जवळपास ९० टक्के पूरस्थितीबाधित शेतकऱ्यांना मदतीची रक्कम पोहोचली असल्याचा दावा करून, शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याचं विरोधका...

December 7, 2025 2:59 PM

views 52

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा विधानपरिषदेच्या सभापतींकडून आढावा

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरूवात होत आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. अत्यावश्यक सुविधा, निवारा,पार्किंग, सुरक्षा व्यवस्था वायफाय, टपाल तसंच आहार याबाबत प्रशासनानं उत्तम पद्धतीनं नियोजन केलं असल्याचं त्यांनी नागपूर इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. विधिमंडळ परिसरात अनावश्यक गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, त्याचप्रमाणे मुंबईहून अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन ...

December 5, 2025 3:34 PM

views 26

‘मागेल त्याला कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरकृषीपंप स्थापन करण्याचा उच्चांक केला आहे. या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.