March 15, 2025 2:24 PM

views 1

देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे पारा घसरला, तर महाराष्ट्रात तापमानात वाढ

देशाच्या उत्तर भागात हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमापकातला पारा घसरला आहे तर महाराष्ट्रात तापमानानं उच्चांक गाठला आहे. जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात काल संध्याकाळपासून पाऊस आणि हिमवृष्टी होत असून हवामान खात्यानं ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. पुढच्या काही दिवसात अनेक भागात अधूनमधून पाऊस आणि हिमवृष्टी होईल. सोमवार पासून खोऱ्यातलं हवामान स्थिर होणार असून येत्या २४ मार्च पर्यंत परिसरातलं हवामान कोरडं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. श्रीनगर मध्ये देखील आज हिमवृष्टी होणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम ...

March 13, 2025 3:46 PM

views 25

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार !

राज्यातल्या अनेक भागात उन्हाचा कडाका वाढला असून, येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास राहील असं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे.

March 11, 2025 3:44 PM

views 22

महाराष्ट्रात ३ वर्षांत १ लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात जवळपास ४६ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. २०२२ ते २०२४ या कालावधीत अपघातांच्या संख्येत सातत्यानं वाढ झाल्याचं सरनाईक यांनी दिलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे.   वाहनचालकाने मद्यपान केलं आहे का, याची चाचणी करणाऱ्या यंत्रांसोबतच त्यांनी अन्य अंमली पदार्थांचं सेवन केलं आहे का, हेदेखील तपासणारी यंत्रं मागवण्याची प्रक्रिया राज्...

March 11, 2025 2:40 PM

views 62

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईच्या विधानभवन परिसरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांना समाजमाध्यमावरच्या संदेशात अभिवादन केलं आहे. 

March 10, 2025 2:09 PM

views 29

राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होणार

राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून अर्थमंत्री अजित पवार यांचा ११वा अर्थसंकल्प आहे. ते आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत सादर करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे

March 10, 2025 1:08 PM

views 25

विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत

महाराष्ट्र विधानसभेत आयसीसी चँपियन्स ट्राफी २०२५ मध्ये अजिंक्य पद पटकाविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह संघातल्या सर्व खेळाडूंचं सभागृहाने  अभिनंदन केलं.

March 7, 2025 2:38 PM

views 21

राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक

गेल्या दहा वर्षांतली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात आली असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागाने डिसेंबर २०२४ पर्यंतचा परकीय गुंतवणुकीसंदर्भातल्या अहवालात ही माहिती दिली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षातल्या पहिल्या ९ महिन्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या १० वर्षात महाराष्ट्रात एका वर्षात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीसह महायुती स...

March 6, 2025 3:21 PM

views 31

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक

महाराष्ट्रात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत  एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ देण्याची मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावर तपासून कार्यवाही करण्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं.   राष्ट्...

March 5, 2025 3:50 PM

views 23

विधानसभेतून समाजवादी पार्टीचे अबु आझमी निलंबित

समाजवादी पार्टीचे आमदार अबु असीम आझमी यांना चालू अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याबद्दल आझमी यांना निलंबित करावं असा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत आझमी यांचं सदस्यत्व विधानसभेच्या पूर्ण कालावधीसाठी रद्द करण्याची मागणी केली. मात्र सदस्यत्व कायमचं रद्द करणं नियमात बसत नसून यासाठी आमदारांची समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं.   काँग्रेस नेते...

March 3, 2025 6:54 PM

views 26

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिभाषणात केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.    देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात राज्याचं १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती आहे, असं ते म्...