March 27, 2025 7:44 PM

views 66

जिंदाल कंपनी राज्यात ‘स्टील’ प्रकल्प उभारणार

जिंदाल स्टेनलेस स्टील महाराष्ट्रात ४२ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे राज्यात १५ हजार ५०० रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडनवीस आणि जिंदाल स्टेनलेस स्टीलचे प्रमुख रतन जिंदाल यांची आज बैठक झाली. 

March 26, 2025 9:23 AM

views 25

राज्यात ‘अवकाळी’ पाऊस !

राज्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसान हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार पाऊस झाल. रत्नागिरी शहर परिसरातही किरकोळ पावसाच्या सरी बरसल्या. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला तर पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात मिरज आणि परिसरात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात सातारा आणि जावळी तालुक्यातल्या काही गावांतही काल पावसानं हजेरी लावली.

March 22, 2025 9:34 AM

views 12

दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला 3 सुवर्णपदक

नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदक मिळवलं.   अकोल्याच्या चैतन्य पाठकनं 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत, तर कराडच्या साहिल सय्यद आणि पुण्याच्या सिध्दी क्षीरसागरनं गोळाफेकीत सुवर्णपदक पटकावलं.   मीनाक्षी जाधव हिनं गोळाफेकीत रौप्यपदक मिळवलं. बॅडमिंटनमध्ये आरती पाटील आणि सुकांत कदम यांनी आपापल्या गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

March 21, 2025 1:10 PM

views 29

घरकुल योजनेपासून वंचित न राहण्यासाठी सर्वेषण करण्याची ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वेक्षण करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गायरान, गावठाण जमिनी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशा जागा उपलब्ध नसतील तर लाभार्थ्याला जागा खरेदीसाठी एक लाख रुपये दिले जातील अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

March 19, 2025 3:31 PM

views 14

महामार्गांवर दर २५ किमी अंतरावर शौचालयं उभी करण्याचा शासनाचा निर्णय

राज्यातल्या महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर शौचालयं उभी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. या स्वच्छतागृहांची देखभाल, सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी सेवाभावी संस्था किंवा बचत गटांना दिली जाईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. महिला स्वच्छतागृहांची कमतरता असल्याचं सांगत भाजपाच्या चित्र वाघ यांनी ही चर्चा उपस्थित केली होती.   रायगड जिल्ह्यात पाचाड इथं राजमाता जिजाऊ समाधीस्थळाच्या विकासासाठी आव...

March 18, 2025 7:02 PM

views 48

विधानपरिषद पोटनिवडणुकीत पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे.

March 17, 2025 3:18 PM

views 28

राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत – अर्थमंत्री अजित पवार

राज्याचं सध्याचं कर्ज सुरक्षित मर्यादेच्या आत आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.  ते आज विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते.   गेल्या १५ वर्षात राज्याचं स्थूल उत्पन्न आणि एकूण कर्ज दोन्ही वाढत गेलं आहे. कर्जाचं स्थूल उत्पादनाशी प्रमाण १६ ते १९ टक्के आहे. २५ टक्क्यापर्यंत आपण कर्ज देऊ शकतो. देशातल्या केवळ ३ राज्यांचं कर्जाचं प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत निराधार आरोप करून राज्याची आर...

March 17, 2025 3:54 PM

views 62

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस

राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आज आपले अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनीही अर्ज भरला. तर अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे.   ही निवडणूक २७ मार्च रोजी होणार आहे आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या जाग...

March 17, 2025 1:26 PM

views 19

कापूस खरेदी पारदर्शक होण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मंत्री जयकुमार रावल

भारतीय कापूस महामंडळामार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून आत्तापर्यंत राज्यात १२४ केंद्रांमार्फत १४२ कोटी ६९ लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.   या संदर्भातील प्रश्न अमित झनक यांनी उपस्थित केला होता. कापसाच्या खरेदीसाठी भावांतर योजना लागू करावी असा आग्रह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी धरला होता. खुल्या बाजारातले व्यापारी देखील या केंद्रामधून कापूस खरेदी कर...

March 17, 2025 3:25 PM

views 29

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ हा अर्थसंकल्पाचा मूळ गाभा – अर्थमंत्री

विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी ५ वर्षांचा विचार करून यंदाचा अर्थ संकल्प सादर केला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेवले आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं. अर्थसंकल्पावरील चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते.    राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही. पण गरज संपलेल्या, द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल. त्यासाठी निधी दिलेला नाही, असे त्यांन...