May 11, 2025 5:05 PM
11
Khelo India : महाराष्ट्राच्या खेळाडूंची ७४ पदकांची कमाई
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवत ७४ पदकांची कमाई केली आहे.अदिती हेगडेनं आतापर्यंत सहा पदकं मिळवली आहेत. कराडची अस्मिता ढोणे हिनं एकंदर १७० किलो वजन उचलून ४९ किलो गटात सुवर्ण पदक जिंकलं.आकांक्षा व्यवहारेनं भारोत्तोलन प्रकारात ४५ किलो गटात सुवर्ण पदक मिळवलं तर टेबल टेनिस मध्ये काव्या भटनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. २७ सुवर्ण, २२ रौप्य आणि २५ कास्य पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. १४ सुवर्ण पदकांसह ३९ पदक मिळव...