May 30, 2025 7:20 PM
10
राज्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरुवात
केेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या देशव्यापी अभियानाला आज पालघर आणि धाराशिव मध्ये सुरुवात झाली. गावोगावी जावून शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणं, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देणं, शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरूकता मोहीम राबविणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. हे अभियान पालघर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या ९० गावांमध्ये राबवलं जाणार आहे. परभणी जिल्ह्यातल्या ताड बोरगाव इथंही विक...