December 30, 2025 8:45 PM
116
अर्ज भरण्याची मुदत संपली, पक्षांतर करुन उमेदवारी पदरात
आज अखेरच्या दिवसापर्यंत अनेक ठिकाणी युती, आघाडी, उमेदवारी यादी यांचं चित्र स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसह मतदारांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे अनेकांनी अखेरच्या दिवशी पक्षांतर करुन उमेदवारी पदरात पाडून घेतली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित होऊन १३७ जागी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तर ९० जागी शिवसेनेचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. रिपब्लिकन पक्षाला जागावाटपातून वगळल्याबद्दल पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी विश्वासघात झाल्याची भावना...