June 22, 2025 2:43 PM

views 4

लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनचं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लडाखमध्ये आयोजित सरहद शौर्यथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये देशभरातून अडीच हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले असून यातून देशाचा आपल्या लष्करावरचा दृढ विश्वास दिसून येत असल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. कारगील विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेनं आयोजित केलेला हा उपक्रम जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये शांतता, देशभक्ती आणि पर्यटन या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे, असं ते म्हणाले. कारगिल युद्ध स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारतर्...

June 20, 2025 4:46 PM

views 19

राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी नद्याचं वाढलेलं पाणी प्रवाहात येत असल्याने विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. पुण्याजवळ खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण ८४ टक्के भरल्याने १५ हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आलं.   नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून एक हजार १६० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. &n...

June 19, 2025 6:53 PM

views 19

गुजरात आणि महाराष्ट्राच्या पुराभिलेखागार यांनी सामंजस्य करार करण्याच्या सूचना

बडोदा संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध होते. त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवजांची देवाणघेवाण आवश्यक असल्यानं गुजरात आणि महाराष्ट्राच्या पुराभिलेखागार यांनी सामंजस्य करार करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी आज दिले. मंत्रालयात पुराभिलेखागार विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.   बडोद्याचे महाराज सयाजीराव जाधव यांच्या मातोश्री महाराणी जमनाबाई गायकवाड यांचं माहेर सातारा जिल्ह्यात रहिमतपूर इथं आहे. त्या ठिकाणी जमनाबाई यांचं स्मारक उभारण्याची माग...

June 18, 2025 8:14 PM

views 12

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात विविध जिल्ह्यांत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरापासून वाड्या वस्त्यांपर्यंत योग दिनाचं आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. योग दिनाचं आयोजन यशस्वी व्हावं यासाठी डिजिटल मदत घेण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं.   सातारा जिल्ह्यातही योग दिनाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींन...

June 18, 2025 7:56 PM

views 6

वसतिगृहांसाठी भाडेतत्त्वावर योग्य जागा निश्चित करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत वसतिगृहांसाठी ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप भाडेतत्त्वावर जागा निश्चित झालेली नाही, तिथं तातडीनं योग्य जागा निश्चित करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. या विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगानं मुंबईत आयोजित बैठकीत ते बालत होते.    २६ जिल्ह्यांमधे १०० विद्यार्थी क्षमतेची मुला-मुलींसाठीची ५६ वसतीगृहं सुरु केली आहेत. या वसतीगृहांना भेटी देऊन सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत याची खात्री करावी, असे निर्देश त्यांनी या...

June 17, 2025 8:07 PM

views 13

Cabinet Decision : महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ला मंजुरी

महाॲग्री-एआय (MahaAgri-AI), अर्थात महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९ला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. यामुळे कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडवता येईल. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातले ॲग्रीस्टेक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढं न्याय...

June 17, 2025 1:07 PM

views 27

शेतमालाची विक्री करण्यासाठी शॉपिंग मॉल उभारणार

महाराष्ट्राच्या विविध भागात सरकार विशेष शॉपिंग मॉल उभारणार असून, या ठिकाणी ग्राहकांना शेतकऱ्यांकडून शेत मालाची थेट खरेदी करता येईल. महाराष्ट्राचे  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली.    हे मॉल्स सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर बांधले जातील, आणि त्यासाठी कृषी विभागाच्या मालकीची ३५ हजार  एकर जमीन उपलब्ध केली जाईल, असं ते म्हणाले. योजनेनुसार मॉलचा ५० टक्के भाग खासगी व्यावसायिकांच्या वापरासाठी  दिला जाईल. यासाठी ३० ते ४० वर्षांचा करार केला जाईल. उरलेला ५० टक्के भाग केवळ शेतकरी सं...

June 16, 2025 3:24 PM

views 8

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे दापोलीतून दाभोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ बंद झाली होती. संगमेश्वर तालुक्यात धामणी-गोळवलीतल्या आमकरवाडीत काल रात्री पडलेल्या अतिपावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग खाली आला. चार-पाच फूट उंचीची पोफळीची ७० रोपं मातीखाली गाडली गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राजापूरमध्ये अर्जु...

June 16, 2025 12:47 PM

views 10

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला असून जनजीवनावर परिणाम झाला आहे. राज्यातल्या शाळा आजपासूनच सुरु झाल्या, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची आणि पालकांची पावसाने तारांबळ उडवली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी येत असून पुढचे दोन दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. घाटमाथ्यावरही पावसाचं मान असून व...

June 14, 2025 2:58 PM

views 8

पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं आज प्रदान

संपूर्ण जग आज भारताकडे फक्त एक जागा म्हणून नाही, तर ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रातला भागीदार म्हणून बघत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केलं. पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं या विद्यापीठांना आज देण्यात आली, या कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. विकसित भारताच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा असून शिक्षणामुळेच देशाचं भविष्य सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना आपल्या देशातच जागतिक दर्जाचं शिक्षण पर...