July 10, 2025 6:16 PM July 10, 2025 6:16 PM
5
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संदीप सांगवे यांचं निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशीची घोषणा
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांचं तत्काळ निलंबन करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करायची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत केली. आमदार संजय उपाध्याय यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. असे प्रकार फक्त मुंबईत नाही, तर राज्यात अनेक ठिकाणी आढळून आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयएएस, आयपीएस अधिकारी आणि या क्षेत्रातल्या तज्ञांच्या विशेष तपास पथकाची स्थापन केली असून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, अशी ग्वाही...