August 23, 2025 6:16 PM

views 6

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाचे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिला स्वावलंबनाचे नवे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवल्या, त्यानिमित्त मुंबईत कार्यक्रमत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही, त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

August 21, 2025 3:23 PM

views 41

राज्याच्या विविध भागात पूरस्थिती

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.    लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या बोरगाव बुद्रुक, धडकनाळ आणि टाकळी या पूरग्रस्त गावांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.   सातारा जिल्ह्यात कोयना धरणासह इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाचे दरवाजे गुर...

August 19, 2025 7:38 PM

views 10

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक, राज्यशासनाचे महत्त्वाचे निर्णय

मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या टप्पा ३ आणि ३A अंतर्गत नवीन रेल्वे गाड्यांची खरेदी करण्याला राज्यशासनानं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. पहिल्या टप्प्यात तब्बल २६८ पूर्ण वातानुकूलित गाड्या खरेदी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.   मुंबईत वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या १६ किलोमीटर लांबीच्या पूर्ण भूमिगत मार्गिकेच्या बांधकामाला, बेस्टबरोबर संयुक्त विकास प्रकल्पाअंतर्गत व्यावसा...

August 19, 2025 4:49 PM

views 8

राज्यात ४२,८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या

सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रातल्या १० सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात स्वाक्षऱ्या झाल्या. या सामंजस्य करारांमुळे राज्यात ४२ हजार ८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २५ हजार ८९२ रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.   राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण मिळावं याकरता राज्य शासन संपूर्ण प्रक्रियेत सहभागी राहील, असं सांगताना फडणवीस यांनी हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळत असल्याचं सांगितलं. या प्रकल्पामुळे लॉजिस्टिक, व...

August 12, 2025 8:08 PM

views 21

राज्यात १५ हजार पोलीस भरती करायला मंजुरी

राज्याच्या पोलीस दलात सुमारे १५ हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा  निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. आता या दुकानदारांना प्रतिक्विंटल दीडशे ऐवजी १७० रुपये फायदा मिळेल. सोलापूर - पुणे मुंबई हवाई  मार्गासाठी व्यापारी तूट भरुन काढण्यासाठी निधी देण्याचा निर्णयही आज झाला. याशिवाय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळांतर्फे राबवण्यात येणाऱ्य...

August 11, 2025 7:14 PM

views 877

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २% वाढ

राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ केली आहे. राज्य सरकारमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसंच निवृत्ती वेतन धारकांना आता ५३ ऐवजी ५५ टक्के महागाई भत्ता मिळेल. १ जानेवारीपासून या महागाई भत्त्याची थकबाकीही ऑगस्टच्या वेतनासोबत दिली जाईल. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला.

August 10, 2025 3:43 PM

views 6

बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू

राज्यातल्या ४५३ विशेष शाळांमध्ये बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम लागू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्थेनं हा अभ्यासक्रम प्रमाणित  केला आहे.  राज्याचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जय वकील फाउंडेशन यांच्यात वर्ष २०१९ मध्ये सामंजस्य करार झाला. त्याअंतर्गत दिशा अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित विशेष ओळखपत्र शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबवायला सु...

August 5, 2025 3:39 PM

views 11

महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण परत आणावी, ही जनभावना लक्षात घेत, राज्य शासन या संदर्भात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. महादेवी हत्तिणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन याप्रकरणात पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदणी मठानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, असंही मुख्यमंत्री म्हणाल...

August 3, 2025 6:37 PM

views 16

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय येण्यासाठी धोरणात्मक बदल करणार – मुख्यमंत्री

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात 'आयएएम' च्या दोन दिवसीय परिषदेच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते. प्रशासकीय यंत्रणेत बदल होण्याची भावना लक्षात घेऊन एप्रिल महिन्यात राज्य स्तरावरच्या सर्व जिहाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची परिषद घेऊन सहा समित्यांची स्थापना केली गेली. या समित्यांनी अभ्यासपूर्ण शिफारशी केल्या असल्याचं ते म्हणाले.

August 3, 2025 2:11 PM

views 140

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार

महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार येत्या मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसंच, चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात येईल.   चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देण्यात येणार आहे. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्र...