September 18, 2025 9:02 PM

views 23

औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी ‘इंडस्ट्रियल टाऊनशिप’ उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्यात मोठ्या औद्योगिक वसाहतींच्या ठिकाणी 'इंडस्ट्रियल टाऊनशिप' उभारण्यात याव्यात. या टाऊनशिप मध्ये संपूर्ण नागरी सुविधा देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत दिले. उद्योगाच्या आजुबाजूलाच निवासाची सुविधा मिळाल्यास कामगारांची क्षमता वाढेल. शहरात, गावात मिळणारे सर्व अधिकार येथे राहणाऱ्या नागरिकांनाही मिळतील, याची व्यवस्था करावी, असं ते म्हणाले.    सूक्ष्म आणि लघुउद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग यासाठी जमिनीच्या काही मर्यादेत अकृषक परवान्याची अट काढण्याचा...

September 18, 2025 8:29 PM

views 53

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत भारतातल्या सात नवीन नैसर्गिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या नवी स्थळांमध्ये महाराष्ट्रातलं पाचगणी आणि महाबळेश्वर इथलं डेक्कन ट्रॅप्स, कर्नाटकमधलं सेंट मेरीज आयलंड क्लस्टरचा भूगर्भीय प्रदेश, मेघालयातल्या गुहा, नागा हिल ओफिओलाईट, आंध्र प्रदेशातलं एरा मट्टी दिब्बालू, तिरुमला टेकड्या आणि केरळमधल्या वर्कला इथले उंच कडे यांचा समावेश आहे.    पाचगणी आणि महाबळेश्वर इथले डेक्कन ट्रॅप्स ही कोयना अभयारण्याच्या परिसरात जांभा दगडांची वैशिष्ट्यपू...

September 17, 2025 9:02 PM

views 30

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस

राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस असल्याचं समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी आज मुंबईत सांगितलं. त्रिभाषा सुत्र समितीद्वारे वेबसाईट आणि विशेष लिंक तयार करण्यात येणार आहे. त्यावर त्रिभाषा धोरण संदर्भात मत मांडता येईल, असं ते म्हणाले. प्रश्नावाली तयार करण्याचं काम सुरू आहे. ही प्रश्नावली संबंधितांना पाठवली जाईल. राज्यातल्या ८ शहरात जाऊन स्थानिकांच्या तसंच राजकीय नेत्यांची भेटीही घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

September 17, 2025 8:58 PM

views 25

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात अतिवृष्टीमुळे शेतातलं पीक देखील हातातून गेलं आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. म्हणून  राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

September 17, 2025 8:01 PM

views 62

प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पर्यटन विभागामार्फत राज्यातला साडे सात हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ आणि पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि ५०० खाजगी आयटीआय मधून हजारो वि...

September 16, 2025 3:52 PM

views 728

Cabinet Decisions: महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. यासाठी सन २०५० पर्यंतचं नियोजन असून सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तसंच राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापुढे ही उपसमिती, मंत्रिमंडळ समिती म्हणून काम करेल.   मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातल्या वि...

September 15, 2025 8:09 PM

views 20

राज्यात जन आरोग्य योजनेद्वारे नवीन उपचारांना मान्यता

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन 2 हजार 399 उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.    जन आरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयाना त्यांची देयके वेळेत देण्यात यावेत. जेणेकरून ती रुग्णालये रुग्णांना दर्जेदार उपचार देतील. तसेच या योजनेत...

September 15, 2025 7:49 PM

views 48

राज्यात पावसाचा जोर, अनेक भाग जलमय

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुणे शहरात काल झालेल्या पावसाचा फटका विमानसेवेला बसला. आज सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात येणारी १४ विमानं अहमदाबाद, हैदराबाद, सूरत, मुंबई या विमानतळांवर उतरवण्यात आली. तर पुणे विमानतळावरची तीन उड्डाणं माघारी उतरली. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही विमानफेऱ्यांना विलंब दिसून आला. हवेली तालुक्यामध्ये थेऊर गावात ओढ्याला पूर आल्याने अडकलेल्या दीडशे जणांना वाघोली अग्निशमन दल आणि पीडीआरएफच्या पथकांनी सुरक्षितपणे...

August 29, 2025 3:35 PM

views 36

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम

   राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं नुकसान झालं असून, प्रशासनानं गाव पातळीवर पंचनामे करून आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.   कोल्हापुरातही राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग आज वाढवला, आज दुपारी धरणाचा अणखीन एक स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला. लातूरमध्ये अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.   नांदेडमध्ये विष्णूपुरी धरण प्रकल...

August 23, 2025 8:15 PM

views 63

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना काल जाहीर झाली. २९ महानगरपालिकांसाठी प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.    बृहन्मुंबई महानगरपालिकेत यात निवडणुकीसाठी २२७ प्रभाग असतील. नवी मुंबई महानगरपालिकेत २८ प्रभाग असून यात २७ प्रभाग चार सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्यीय आहे, यातून १११ सदस्य निवडले जाणार आहेत.  नागपूर मधे एकूण ३८ प्रभाग असतील. यात चार सदस्यीय प्रभाग ३७ तर एक प्रभाग तीन सदस्यीय असेल.   नागपूर महानगरपालिकेत १५१ नगरसेवक निव...