September 24, 2025 1:24 PM
56
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
महाराष्ट्रात मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं असून त्यांचं मोठं नुकसान झालं. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहणी करत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव आणि सिना दारफळ या गावांना भेट देत पूरस्थितीची पाहणी केली. दुपारी ते लातूर आणि धाराशी...