October 7, 2025 8:20 PM

views 62

राज्यात मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण!

एकाच आवारात असलेल्या असलेल्या मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याशिवाय इच्छुक असलेल्या कन्या शाळांना सहशिक्षणाच्या अर्थात मुला-मुलींच्या एकत्र शाळेत रुपांतरित करायला राज्य सरकार मान्यता देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यासंदर्भातला शासन आदेश आज जारी झाला.

October 7, 2025 7:28 PM

views 40

सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत तसंच  कर्जमाफी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.    अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने केवळ ६ हजार ५०० कोटी रुपये इतकीच मदत दिली असून बाकीचे पैसे वेगवेगळ्या योजनांचा भाग आहेत, त्यांचा समावेश पॅकेजमधे करून सरकारने चलाखी केल्याची टीका किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे. 

October 7, 2025 7:27 PM

views 813

Maharashtra : राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्याच्या सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदेतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करायच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यभरातल्या ४२४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे धोरण राबवलं जाईल. महाराष्ट्र रत्नं आणि दागिने धोरण २०२५ सुद्धा या बैठकीत मंजूर झालं.   सोनं, चांदीचे दागिने, हिरे, रत्नं यांच्याशी निगडीत उद्योग-व्यवसाय वाढीला चालना मिळणार आहे. या क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तुकडे बंदी अधिनि...

October 7, 2025 5:53 PM

views 48

राज्यसरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं, रोहित पवारांची टीका

राज्यसरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. आपत्तीग्रस्तांना देण्याच्या मदतीचा निधी केंद्रसरकारच्या योजनांमधून देण्यात आलं तर त्याला विलंब होऊ शकतो. तसंच आत्ता राज्यशासनाने जाहीर केलेलं अर्थसहाय्य शासनाच्याच तत्सम योजनांच्या तुलनेत अपुरं असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.    निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं राज्यसरकार पाळत नसून शेतकऱ्यांच्या नुकसानीला शासन जबाबदार असल्याचा...

October 6, 2025 7:04 PM

views 57

गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी आहेत, त्यामुळे राज्यात गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत ट्वेंटी-ट्वेंटी गुंतवणूक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत बोलत होते.    धोरणात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांचा होत असलेला विकास यामुळे महाराष्ट्र हे देशाचं ' ग्रोथ सेंटर' बनलं आहे. मुंबई ही देशाच्या आर्थिक राजधानी सोबतच मनोरंजन, स्टार्ट अपची सुद्धा राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातलं गुंतवणुकीचं 'मॅग्नेट'ही ठर...

October 5, 2025 7:07 PM

views 46

आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल, केंद्रीय गृहमंत्र्यांचं आश्वासन

राज्यातल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत देईल असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं ते शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते.   केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण ३ हजार १३२ कोटी रुपयांच्या मदतीसाठी मान्यता दिली असून त्यापैकी १ हजार ६३१ कोटी रुपयांच्या मदतीचं वितरण एप्रिल महिन्यात झाल्याची माहिती अमित शहा यांनी दिली. यात महाराष्ट्रासाठी २१५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजचाही समावेश असल्याचं ते म्हणाले. कर्ज वसुलीला तात्पु...

October 5, 2025 6:49 PM

views 44

Shakhti Cyclone : राज्यात जोरदार पावसाची शक्यता

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या मंगळवारपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. समुद्रात सध्या ताशी १०० किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्यानं, मच्छिमारांनी ७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशा...

October 5, 2025 1:43 PM

views 56

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते अहिल्यानगर मध्ये प्रवरानगर इथं डॉ. विठ्ठलटाव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण सोहळा झाला.  तर लोणी इथं त्यांच्या हस्ते सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि  लोकनेते, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं  अनावरण झालं.  याशिवाय देशातला  पहिला सहकारी कॉम्प्रेस बायो गॅस  प्रकल्प आणि  स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचं उदघाटन देखील त्यांच्या हस्ते झालं.     ...

October 4, 2025 8:11 PM

views 356

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेलं शक्ती चक्रीवादळ शक्तिशाली होण्याची शक्यता

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या दरम्यान, समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यामुळे पुढचे काही दिवस मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

September 30, 2025 4:56 PM

views 71

राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघ सुरू

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस ओसरला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विविध धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी प्रकल्पातून सध्या १ लाख २ हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. राज्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या माऊली प्रतिष्ठानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ लाख १ हजार १११ रुपये दिले आहेत. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यात नागुर इथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बाल...