October 13, 2025 7:18 PM

views 78

नैऋत्य मौसमी पावसाची राज्यातून पूर्णपणे माघार

नैऋत्य मौसमी पावसानं राज्यातून पूर्णपणे माघार घेतली असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय. राज्यातला मान्सूनचा माघारीचा प्रवास आज पूर्ण झाला. आता केवळ दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनची माघार शिल्लक आहे.    येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 

October 12, 2025 8:00 PM

views 59

राज्यात १५ ऑक्टोबरनंतर वादळी पावसाचा अंदाज

येत्या २ दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कोकणात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरनंतर वादळी पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना पावसापासून सुरक्षित ठेवण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. 

October 12, 2025 6:15 PM

views 65

माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज – काँग्रेस

माहिती अधिकार कायदा सक्षम बनवण्यासाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस सरकारनं आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्ष पूर्ण झाली, मात्र जनतेला दिलेल्या या महत्वाच्या अधिकाराची धार भाजपा सरकार बोथट करत आहे, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा कायदा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

October 12, 2025 5:06 PM

views 33

कृत्रिम फुलांच्या विक्रीमुळे शेतकरी उध्वस्त

सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात कृत्रिम फुलांची विक्री वाढल्यामुळे नैसर्गिक फुलशेती करणारा शेतकरी उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसंच कृत्रिम फुलांमुळे होणारी पर्यावरणाची हानी लक्षात घेता, महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं यावर निर्बंध आणावेत, अशी मागणी सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे. कृत्रिम फुलांना कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली होती. याबाबतच्या शासन निर्णया...

October 12, 2025 4:51 PM

views 230

राज्य शासनाचा खान अकॅडमीशी सामंजस्य करार

डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवण्यासाठी राज्य शासनाने खान अकॅडमीशी सामंजस्य करार केला आहे. याचा लाभ ५० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ मध्ये राज्यातील सुमारे ६२ हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञान विषयक शैक्षणिक सामग्री अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल. ही शैक्षणिक सामग्री मराठी आणि इंग्रजी भा...

October 10, 2025 3:46 PM

views 248

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने १५ टक्के मानधन वाढ काल जाहीर केली आहे. राज्यभरातल्या ५० हजार कर्मचाऱ्यांना जून २०२५ पासून या मानधनवाढीचा लाभ मिळेल. या कर्मचाऱ्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचारी कल्याण निधी उभारणे, यासह इतर मागण्यांवर कार्यव...

October 9, 2025 3:02 PM

views 289

पूरग्रस्तांना मदत म्हणून १ दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचं राज्य सरकारचं आवाहन

राज्यातल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून १ दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं आहे. त्यासाठीचं संमतीपत्रक कार्यालयात उपलब्ध करुन देण्याचे आदेश सरकारनं काल जारी केले. राज्य सरकारच्या सेवेतले सर्व अधिकारी-कर्मचारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, महामंडळातल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनाही त्यांचं  एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करता येईल.

October 8, 2025 7:02 PM

views 38

ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहासाठी जमीन अधिग्रहित करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश

ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, कार्यालय आणि अभ्यासिका उभारण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करून जागा निश्चित करण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आज मंत्रालयात बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत अनेक जिल्ह्यांमधल्या जागा निश्चितीच्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आलं. ज्या जिल्ह्यांमध्ये जागा अद्याप निश्चित केलेली नाही, त्यांनी तातडीनं योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत, जिल्ह्याधिकाऱ्य...

October 8, 2025 7:30 PM

views 90

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ!

पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, यासोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते आज मंत्रालयात पूरग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी आयोजित  बैठकीत बोलत होते.  

October 8, 2025 6:48 PM

views 32

नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या जीडीपीत १ टक्के वाढ होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं. नवी मुंबई विमानतळामुळे राज्याच्या जीडीपीत १ टक्के वाढ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.हा विमानतळ देश आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका निभावेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी म्हणाले.    या विमानतळाच्या परिसरात तिसरी मुंबई आणि वाढवण परिसरात चौथी मुंबई उभारली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढवण विमानतळ हे समुद्र किनाऱ्यावरचं देशातलं पहिलंच विमानतळ असेल. त...