November 2, 2024 6:58 PM November 2, 2024 6:58 PM

views 11

वाशिम जिल्ह्यात भाजपानं युतीचा धर्म पाळला नाही तर,  शिवसेना युतीचा धर्म पाळण्यास बांधील राहणार नाही – रवी भांदुर्गे

वाशिम जिल्ह्यात भाजपानं युतीचा धर्म पाळला नाही तर,  शिवसेना सुद्धा जिल्ह्यात युतीचा धर्म पाळण्यास बांधील राहणार नाही असा इशारा वाशीमचे युवा सेना जिल्हाध्यक्ष रवी भांदुर्गे यांनी दिला आहे. ते वार्ताहरांशी बोलत होते. रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांनी अर्ज भरताना वाशीम मधले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. याचाच अर्थ भाजपा युतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप भांदुर्गे यांनी केला. देशमुख यांनी अर्ज मागे घेतला नाही, ...

November 2, 2024 6:48 PM November 2, 2024 6:48 PM

views 16

विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाला सहकार्य करणार नसल्याचं विदर्भातल्या रिपाई गटाचं जाहीर

भारतीय रिपल्बिकन पक्ष - आठवले गटाच्या विदर्भातल्या कार्यकर्त्यांनी या विधानसभा निवडणुकीत आपण भाजपाला सहकार्य करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी यासंदर्भात पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पत्र पाठवलं आहे. भाजपासोबत गेल्या दहा वर्षांपासून युती असतानाही, रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळत नाही, भाजपानं लोकसभा आणि विधानसभेतही पक्षाला एकही जागा सोडली नाही, अनेक महामंडळांवरच्या नियुक्त्या, राज्यपाल नियुक्त आमदार यातही पक्षाचा विचार केला गेला नाह...

November 2, 2024 5:04 PM November 2, 2024 5:04 PM

views 12

महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरांची धूसफूस अद्यापही सुरूच

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रामुख्याने सामना असला तरी दोन्ही बाजूंनी बंडखोरीच्या फटाक्यांचे बारही उडत आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही ३६ जणांची बंडखोरी कायम आहे. भाजपामधील १९, शिवसेनेमधील १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील २ जणांनी आपल्या बंडखोरीची वात पेटती ठेवली आहे. त्यामुळे हे बंडखोरांचे फटाके युतीला किती धक्का देणार हा प्रश्न कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये २६ बंडखोरांची धूसफूस अद्यापही सुरूच आहे.