November 18, 2024 7:05 PM November 18, 2024 7:05 PM

views 12

महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप

महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मुंबई शहरात मेट्रोचं काम अद्याप अपूर्ण आहे. मेट्रोमार्गासाठी बसवलेल्या खांबांवर अनेक ठिकाणी अद्याप गर्डर टाकणं बाकी असताना त्याचं रंगकाम करण्यात आलं आहे. यासाठी ७४ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला

November 13, 2024 12:51 PM November 13, 2024 12:51 PM

views 14

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत राबवण्यात आले विविध उपक्रम

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत काल सांगली शहरात आणि सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं सायकल आणि दुचाकी फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.   धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेनं रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यासह मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती केली. तसंच घरोघरी जाऊन मतदारांना मतदानाचं महत्त्व सांगितलं जात आहे. कोल्हापूरमध्ये विविध शासकीय तसंच निम शासकीय कार्यालयांती...

November 13, 2024 10:47 AM November 13, 2024 10:47 AM

views 13

राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात - १३, बीड - आठ, जालना आणि लातूर प्रत्येकी सहा, नांदेड - नऊ, धाराशिव - चार, तर परभणी जिल्ह्यात...

November 13, 2024 10:30 AM November 13, 2024 10:30 AM

views 12

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार आहे.   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. वंचित बहुजन...

November 12, 2024 11:41 AM November 12, 2024 11:41 AM

views 12

राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्याने, सर्वच उमेदवारांनी वाढवला प्रचाराचा वेग

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत; त्यामुळे विविध राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, प्रचार करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या आणि उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठीची लगबग वाढली आहे.   प्रधानम आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत. तत्पूर्वी आज दुपारी चिमुर आणि नंतर सोलापूर इथंही मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. के...

November 12, 2024 11:16 AM November 12, 2024 11:16 AM

views 14

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन

नांदेड विधानसभा मतदार संघातल्या गावामध्येही एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून, या व्हॅनचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल उपस्थित होते. जिल्ह्यात मागील निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी कमी मतदान झालं आहे, त्याठिकाणी या व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी म्हणाले. धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं मतदार जनजागृती यात्रेचा काल प्रार...

November 11, 2024 11:16 AM November 11, 2024 11:16 AM

views 10

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच उमेदवारांचा जनसंवादावर भर

काल सुटीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, जनसंवाद आणि सभा घेण्यावर भर दिल्याचं दिसून आलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल पदयात्रा काढली. याच मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांची सभा झाली. औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी काल पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले माहाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यां...

November 11, 2024 9:14 AM November 11, 2024 9:14 AM

views 25

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक ठिकाणी गृहमतदान सुविधा उपलब्ध

भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सांगली जिल्ह्यात नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली देत आहे. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी भारत निवडणूक आयोग आणि निवडणूक यंत्रणेचे आभार मानले आहेत. वाहतूक शाखा सांगलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या 91 वर्षांच्या मातोश्री मंगला कुलकर्णी यांनी गृह मतदान सुविधेव्दारे मतदान केलं. तर नेमिनाथनगर इथल्या 86 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक विद्य...

November 5, 2024 1:07 PM November 5, 2024 1:07 PM

views 11

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार १४० उमेदवार रिंगणात

  महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचं चित्र स्पष्ट झालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार १४० उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातल्या २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते; उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत २ हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.   अनेक मतदार संघातली बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलं आहे; त्याचवेळी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने तिथे चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. का...

November 4, 2024 2:56 PM November 4, 2024 2:56 PM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई आणि मुंबई इथं या सभा होतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.