November 19, 2024 6:45 PM

views 25

मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा सर्वसाधारण कल

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६३ टक्क्यांपेक्षा जास्त आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ६१ पूर्णांक १ दशांश टक्के मतदानाची नोंद झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१ पूर्णांक ३३ शतांश टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाचा हक्क बजावण्यात महिलांपेक्षा पुरुष आघाडीवर असल्याचा सर्वसाधारण कल आहे.  यंदा मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वत्र मतदान केंद्रांची माहिती देणाऱ्या मतदान चिठ्ठ्या निवडण...

November 18, 2024 8:01 PM

views 39

मुंबईत १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामावर तैनात

विधानसभा निवडणुकीत मुंबईत १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामावर तैनात आहेत. बंदोबस्तासाठी २५ हजारांहून अधिक पोलीस तैनात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. मुंबईत प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असलेली एकंदर ७६ मतदान केंद्रं आहेत. मतदार जनजागृतीसाठी केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती त्यांनी दिली.

November 18, 2024 7:59 PM

views 29

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. ५६ हजारांहून अधिक शस्र जमा केली असून ६११ शस्र परवाने रद्द झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ६६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यात १५३ कोटी रुपयांहून अधिक रोख, २८२ कोटी रुपयांहून अधिक रकमेचे मौल्यवान धातू यासह इतर गोष्टींचा समावेश आहे. सर्वाधिक २२९ कोटी रुपयाच्या मालमत्तेची जप्ती मुंबई उपनगर जिल्ह्यात झाली आहे.    नाशिक शहरातल्या एका हॉटे...

November 18, 2024 7:42 PM

views 51

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा रमेश चेन्नीथला यांचा आरोप

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर होत असून निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवण्याची मागणी आपल्या पक्षानं याच कारणासाठी केली होती, मात्र अजूनही पोलीस दलाकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे.

November 18, 2024 7:39 PM

views 23

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल-विनोद तावडे

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल, असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगितलं. धारावीतल्या लोकांना विस्थापित करण्यात येणार आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली जाणार नाही, ती राज्य शासनाच्याच ताब्यात राहील, असं तावडे यांनी स्पष्ट केलं.

November 18, 2024 7:38 PM

views 21

महायुती सरकार असंविधानिक, भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरुन खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट-बाळासाहेब थोरात

राज्यातलं महायुती सरकार असंविधानिक आणि भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरुन खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते आज संगमनेर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात सर्वत्र महायुती सरकार बद्दल प्रचंड राग असून, या निवडणुकीत १८० जागा जिंकून महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

November 18, 2024 7:34 PM

views 21

महायुुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील-चंद्रशेखर बावनकुळे

महायुुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि सरकार आपलंच येईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूरात ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसने लोकसभेत खोटा प्रचार केला असून त्यावर जनतेचा विश्वास उरला नाही, त्यामुळे हरियाणात झालं तसंच महाराष्ट्रात होईल, असा दावा त्यांनी केला.

November 18, 2024 7:32 PM

views 14

महायुती सरकारच्या काळात महागाई आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ-मल्लिकार्जुन खर्गे

महायुती सरकारच्या काळात शेतकरी, कामगार, तरुण, महिला यांचं जगणं कठीण झालं आहे, महागाई आणि बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, अशी टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन केलं. ते वसई इथं प्रचारसभेत बोलत होते. भाजपा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असून काँग्रेस जोडण्याचं काम करत आहे, असं खर्गे म्हणाले. भाजपा आणि महायुतीने भ्रष्टाचार करून लुटले आहे, महाविकास आघाडी मात्र दिलेली आश्वासनं सत्ता आल्यावर पूर्ण करेल असं खर्गे यांनी सांगितलं.

November 18, 2024 7:24 PM

views 23

महाविकास आघाडीनं अनेक विकासकामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा- मुख्यमंत्री

महाविकास आघाडीनं अनेक विकासकामांमध्ये अडथळे आणल्यामुळे लाखो रोजगारांवर गदा आली असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केला. मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाढवण बंदर, जैतापूर, बारसू रिफायनरी अशा अनेक प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. कोविड काळातही महाविकास आघाडीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. त्यामुळे महायुतीचं सरकार आणण्याचा निश्चय जनतेनं घेतला आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

November 18, 2024 7:23 PM

views 18

सबका साथ, सबका विकास हेच आपलं ध्येय – नितीन गडकरी

आपल्या सरकारने नागपूरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी केला असून सबका साथ, सबका विकास हेच आपलं ध्येय आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या नागपूर इथं आयोजित सांगता सभेत ते बोलत होते.  काँग्रेसकडे साठ वर्षे सत्ता असूनही नागपूरचा विकास झाला नाही, मात्र भाजपा सरकारच्या दहा वर्षांच्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलला असं गडकरी यांनी सांगितलं.