April 28, 2025 7:08 PM April 28, 2025 7:08 PM
24
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना
राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातली पर्यटन स्थळं, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरवणं हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असेल. सातारा इथं १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात पर्यटन सुरक्षा दलाचा पहिल्यांदा प्रयोग केला जाणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.