September 29, 2025 3:17 PM September 29, 2025 3:17 PM

views 51

राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं न भरून येणारं नुकसानं झालं आहे, या स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आदी मागण्या वडेट्टीवार यांनी केल्या आहेत...