August 25, 2024 7:07 PM August 25, 2024 7:07 PM
13
पुढचे दोन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस
पुढचे दोन दिवस कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, पुणे, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.