August 10, 2025 6:09 PM
14
पुढचा आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज
पुढचा आठवडाभर राज्यातल्या चारही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.