October 22, 2025 3:00 PM October 22, 2025 3:00 PM
53
राज्यात पुन्हा पाऊस बरसणार, ‘येलो अलर्ट’ जारी
मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागासाठी हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसंच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.