June 19, 2025 7:22 PM June 19, 2025 7:22 PM
7
भूसंपादन पूर्ण करून महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातल्या महत्वाच्या सर्व प्रकल्पांचं भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत. राज्यातल्या महत्वाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी घेतला. त्यात शक्तीपीठ महामार्ग, पुणे रिंग रोड यासह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.. प्रकल्प रखडल्यामुळ...