March 1, 2025 9:10 PM March 1, 2025 9:10 PM

views 17

अंमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणारे पोलीस सेवेतून बडतर्फ

अंमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं यापुढे केवळ निलंबन न करता पोलीस सेवेतून बडतर्फ केलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत झालेल्या पोलीस संमेलनात बोलत होते. या संमेलनात देशात नव्यानं  तयार झालेल्या तिन्ही कायद्यांच्या अंमलबजावणीचं आणि सायबर प्लॅटफॉर्मचं   सादरीकरण झालं.   तसंच, महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी न्यायालयासमोर आरोपपत्र जलद गतीनं वेळेत कसं ठेवता येईल, यावर देखील चर्चा झाली. नवीन कायद्यानुसार एखाद्या गु...

January 2, 2025 7:22 PM January 2, 2025 7:22 PM

views 10

‘महाराष्ट्र पोलीस दल’ देशातलं आदर्श पोलीस दल असल्याचं राज्यपालांचं गौरवोद्गार

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आज मुंबईत गोरेगाव इथं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातलं आदर्श पोलीस दल असल्याचे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचं निरीक्षण केलं आणि मानवंदना स्वीकारली.

November 30, 2024 7:43 PM November 30, 2024 7:43 PM

views 13

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी २६ आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या सर्व २६ आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आत्तापर्यंत मुख्य शूटर शिव कुमार गौतम सह एकूण २६ आरोपींना अटक केलेली असून या प्रकरणी अद्याप पुढील तपास सुरु आहे. मकोका अंतर्गत पोलिसांसमोर दिलेली जबानी न्यायालयात ग्राह्य धरली जाते. तसंच या गुन्ह्याखाली अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळणं कठीण असतं. ६६ वर्षीय माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या महिन्याच्या १२ ऑक्टोबर ...

July 1, 2024 8:06 PM July 1, 2024 8:06 PM

views 62

३ नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू

भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून देशभरात लागू झाले. ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांची जागा घेणारे हे कायदे संसदेने मागच्या वर्षी संमत केले होते. हे तीन नवे कायदे लागू करण्यापूर्वी सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांशी केंद्र सरकारनं अनेकदा चर्चा केली आहे. त्यामुळे देशभरातली राज्य सरकारं हे कायदे अंमलात आणण्यासाठी सज्ज आहेत. या फौजदारी कायद्यांचा उद्देश शिक्षा देणं नसून न्याय देणं आहे, असं सरकारनं म्हटलं आहे. त्यामु...

June 19, 2024 4:24 PM June 19, 2024 4:24 PM

views 7

राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

राज्यभरात विविध ठिकाणी आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात ५९ रिक्त पदांसाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी एकूण ३ हजार ५७७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेची मैदानी चाचणी १९ ते २७ जून दरम्यान पालघर मध्ये होणार आहे.   वाशिम जिल्ह्यातही पोलिस दलातल्या ६८ रिक्त जागांसाठी आज सकाळपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. या जागांसाठी चार हजार २७९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ही भरती प्रक्रिया पुढील तीन दिवस चालणार आहे.     बुलडाणा जिल्हा पोलिस दला...