January 21, 2025 12:51 PM January 21, 2025 12:51 PM
11
जागतिक आर्थिक मंच : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन
दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध राज्यांचे आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस आज विविध कंपन्यांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, तसंच अनेक सामंजस्य करार करणार आहेत. जागतिक आर्थिक मंचाच्या स्वागत समारंभाला ते आज उपस्थित राहणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक क्लॉस श्वाब आणि होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांची भेट घ...