July 18, 2025 7:10 PM July 18, 2025 7:10 PM

views 9

हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा

विधान भवनात काल झालेल्या हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. एका आठवड्यात याचा निर्णय होईल अशी घोषणा अध्यक्षांनी केली. तसंच, मंत्र्यांनीही विधिमंडळात बैठक घेऊ नये, असं आवाहनही अध्यक्षांनी केलं. हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.    अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. तर या घटनेला आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही असं आम...

July 9, 2025 1:40 PM July 9, 2025 1:40 PM

views 8

छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराप्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्याचं निलंबन होणार

छत्रपती संभाजीनगर इथं विद्यादीप बालसुधारगृहमधे अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची घटना, अतिशय गंभीर असून, याप्रकरणी जिल्हा बालविकास अधिकाऱ्याविरोधात कारवाई करत तत्काळ त्याचं निलंबन केलं जाईल, तसेच संबंधित संस्थेची मान्यता देखील रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. आमदार चित्रा वाघ यांनी अल्प सूचना प्रश्नाद्वारे हा मुदा सभागृहात नियमित कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला.    या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर, मारहाण करण्यासह अनेक अमानवी पद...

July 9, 2025 1:34 PM July 9, 2025 1:34 PM

views 11

मुंबईतल्या डोंगराळ भागात दरड कोसळणे याप्रकरणी नव्याने सर्वेक्षण होणार

मुंबईतल्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याचं प्रमाण लक्षात घेऊन याबाबत नव्याने सर्वेक्षण करण्यात येईल आणि आयआयटी मुंबईने यावर सुचवलेल्या उपाययोजनांनुसार कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतचा मूळ प्रश्न सुनील राऊत यांनी उपस्थित केला होता, त्यावर राम कदम, अजय चौधरी, अशोक पाटील यांनी उपप्रश्न विचारले. २०१७ साली भारतीय भौगोलिक विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकूण ७४ दरड ग्रस्त ठिकाणं असून त्यातील ४६ ठिकाणं अत...

July 8, 2025 3:29 PM July 8, 2025 3:29 PM

views 17

राज्यातल्या गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार

राज्यातील झॉमेटो, स्विगी अशा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सची संख्या भविष्यात वाढणार असून, सरकार त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदे निर्माण करणार असून, त्याच्या मसूद्यावर सध्या काम सुरू असून, त्याद्वारे या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विरोधी पक्षांनी, नियम २६० अन्वये मांडलेल्या ठरावाला उत्तर देतांना दिली.   संघटित कामगारांपेक्षा, असंघटित कामगारांची संख्या वाढलेली असून, त्यांच्या कल्याणाकरता राज्यात ६८ व्हर्चुअल बोर्डची ...

July 7, 2025 3:05 PM July 7, 2025 3:05 PM

views 9

छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम प्रकरणाची चौकशी होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मौजे लासूर इथे शाळा बांधकाम आणि मौजे गुरुधानोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी पुढच्या दोन महिन्यात करण्यात येईल आणि तथ्य आढळल्यास त्यावर कारवाई होईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या प्रकरणात आरोप झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातल्या शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचं निलंबन करण्यात आल्याची माहितीही गोरे यांनी दिली. विधानपरिषद सदस्य सतीश चव्हाण यांनी ...