December 15, 2025 7:13 PM

views 63

निवडणुकीचं बिगुल वाजलं, ‘या’ दिवशी होणार मतदान

राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेनंतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.   राज्यभरातल्या २९ महापालिकांमधल्या एकंदर २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होईल. त्यापैकी १ हजार ४४२ जागा महिलांसाठी, ७५९ ओबीसींच्या, ३४१ अनुसूचित जमातींसाठी आणि ७७ जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. मुंबई महानगरपालिका नि...

November 13, 2025 3:33 PM

views 1.6K

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकूण ९ कोटी ८४ लाख ९६ हजार ६२६ मतदार असतील. राज्य निवडणूक आयोगाने अद्ययावत यादी संकेतस्थळावर जाहीर केली आहे. १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार यादीनुसार ही यादी प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वीच्या म्हणजे राज्य विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदारसंख्या ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ होती. त्यात सुमारे १४ लाख ७० हजार मतदारांची भर पडली आहे. गेल्या ७ महिन्यात ४ लाख ९ हजार ४६ मतदारांची नावं बाद झाली, तर१८ लाख ८० हजार ५५३ नवीन मतदार नोंदले गेले. सर्वात जास्त नवीन म...

November 10, 2025 8:44 PM

views 1.6K

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात

महाराष्ट्रातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात     मुंबई, दि. 04 (रानिआ): निवडणूक होत असलेल्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आजपासून नामनिर्देशपत्र सादर करण्यास सुरुवात झाली असून, त्यासाठी 664 उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे ...

November 6, 2025 7:36 PM

views 37

Maharashtra Local Body Election: आचारसंहितेत सूट देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेत सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या समितीची गरज व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार वाघमारे यांनी हे निर्देश दिले आहेत.

October 16, 2025 7:01 PM

views 373

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता – राज्य निवडणूक आयुक्त

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले. या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.    राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकांसाठी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचं तसंच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनंही आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आश्वासन मुख्य सचिव राजेश कुमार यांनी...