December 17, 2024 1:50 PM

views 36

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन : विधानसभेत तालिका सद्यस्यांची नियुक्ती

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत तालिका सदस्य म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम आणि दिलीप सोपल यांची नियुक्ती केल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. सभागृहाचे माजी सदस्य आणि माजी मंत्री दत्तात्रय राणे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव अध्यक्षांनी मांडला आणि तो मंजूर झाला. तत्पूर्वी, कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी परभणी आणि बीड इथल्या घटनांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेतही विरोधक या मु...