March 16, 2025 8:13 PM March 16, 2025 8:13 PM

views 48

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे.   ही निवडणूक २७ मार्च रोजी होणार आहे आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त ज...

December 19, 2024 1:49 PM December 19, 2024 1:49 PM

views 15

विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती पदावर सभागृहाने एकमताने निवड केल्या बद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले .

December 18, 2024 7:24 PM December 18, 2024 7:24 PM

views 10

विधानपरिषदेच्या सभापतीपदी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांची निवड होण्याचा मार्ग मोकळा

राज्य विधान परिषदेच्या सभापती पदासाठी महायुतीच्या वतीनं राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजेपर्यंत अन्य उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्यानं शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

December 17, 2024 1:48 PM December 17, 2024 1:48 PM

views 15

विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक १९ तारखेला होणार

विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या १९ तारखेला होणार असल्याची घोषणा आज सभागृहात करण्यात आली. या निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.

September 3, 2024 8:29 PM September 3, 2024 8:29 PM

views 10

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

महाराष्ट्र विधान परिषदेनं स्थापनेपासून आत्तापर्यंत गेल्या १०३ वर्षांमध्ये इथल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम केलं आणि जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. त्या आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. या सभागृहानं वादविवाद आणि संवादाची परंपरा कायम ठेवून लोकशाही मजबूत केली, असं त्या म्हणाल्या.   राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष कर...

July 28, 2024 2:44 PM July 28, 2024 2:44 PM

views 12

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. भाजपाच्या पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, शिवसेनेच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर या सदस्यांनी शपथ घेतली. विधानपरिषदेच्या अकरा...

July 10, 2024 3:40 PM July 10, 2024 3:40 PM

views 14

मराठा, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक गैरहजर राहिल्याचा मुद्दा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडल्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी हौद्यात उतरून प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी केली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करूनही शांतता प्रस्थापित न झाल्याने या गदारोळातच पुरवणी मागण्या मंत्री उदय सामंत यांनी सभागृहासमोर मांडल्या. त्यावर एकमत झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं विधानपरिषदेचं कामकाज...