July 2, 2025 8:27 PM

views 17

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा निर्णय

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर 'मकोका' अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून यासंदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. असे गुन्हेगार एका राज्यात अटक होऊन जमीन मिळाल्यानंतर दुसऱ्या राज्यात जाऊन तिथे गुन्हे करतात, हे टाळण्यासाठी सर्व राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा गुन...

May 15, 2025 1:48 PM

views 177

महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाइट बंद

महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in आणि सरकारी निर्णय-जीआर पोर्टल www.gr.maharashtra.gov.in नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यावतीकरणाच्या कामासाठी आज आणि उद्या दोन दिवस बंद राहील. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळानं ही माहिती दिली आहे. या कालावधीत अधिकृत सरकारी पोर्टलवर कोणत्याही सेवा उपलब्ध नसतील.

March 9, 2025 6:24 PM

views 15

माध्यम निरीक्षणाविषयी शासन निर्णयावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण

माध्यम निरीक्षणविषयी केलेल्या शासन निर्णयाचा उद्देश टीकेला आळा घालणं किंवा माध्यमांवर देखरेख करणं नसून चुकीच्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर कार्यवाही करणं असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांना अचूक माहिती पुरवणं हे शासनाचं कर्तव्य आहे, चुकीच्या माहितीचं निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत असून घटनात्मक मर्यादांचं पालन करणारी कार्यपद्धती विकसित केली जात असल्याचं सरकारने सांगितलं. शासन विविध माध्यम संस्थांशी संवाद साधून या उपक्रमात आवश्यक त्या सुधारणा करत आहे, असंही सरकारने स्प...