September 30, 2025 9:10 PM September 30, 2025 9:10 PM
490
ओला दुष्काळ नियमात बसत नसला, तरीही दुष्काळाच्या सवलती लागू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करणं नियमात बसत नाही, मात्र दुष्काळासाठी ज्या सवलती लागू केल्या जातात तशाच सवलती लागू केल्या जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फ़डनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात ६० लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, सरकारने ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीसाठी २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करायला सुर...