November 25, 2025 8:35 PM November 25, 2025 8:35 PM

views 4

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती आणि अकोला जिल्ह्यात प्रचारसभा घेतल्या. शहरी जीवनमान बदलण्यासाठी आपल्याकडे स्पष्ट आराखडा आहे, या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेचा विश्वास आणि मतांची ताकद आवश्यक आहे. त्यामुळे योग्य उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं. धारणी इथंही मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली. 

November 17, 2025 7:10 PM November 17, 2025 7:10 PM

views 419

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपुष्टात आली. उद्या, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदेश पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल क...

October 9, 2025 8:51 PM October 9, 2025 8:51 PM

views 2.1K

राज्यातल्या निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,  नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली. या यादीतली नावे mahasecvoterlist.in या वेबसाइटवर मतदारांना शोधता येतील. तहसील, नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या कार्यालयातही ही यादी उपलब्ध आहे. 1 जुलै 2025 रोजी विधानसभा मतदार यादीत नाव असलेल्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.