June 8, 2025 7:02 PM June 8, 2025 7:02 PM
139
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं देत नसल्याचा काँग्रेसचा आरोप
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तरं का देत नाही असा सवाल काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं, की राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तरं दिली पाहिजेत परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात लेख लिहून जनतेची दिशाभूल केली आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या वेळचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आणि किरण कुलकर्णी यांची ...