November 23, 2025 7:21 PM November 23, 2025 7:21 PM

views 28

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. लोक काँग्रेसनं ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न विचारतात काँग्रेसनं रोजगार, शिक्षणासह असंख्य कामं केली असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या कामांचा हिशोब करायला गेल्यावर कागद संपतो मात्र भाजपाच्या कामांचा हिशोब केला तर त्यांनी राज्याला खोटारडेपणा दिला अशी टीका त्यांनी केली. भाजप...

November 17, 2025 7:10 PM November 17, 2025 7:10 PM

views 185

आरक्षणाची ५० टक्के कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओलांडता येणार नाही – SC

एकंदर आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाळावीच लागेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. बांठिया आयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करायच्या सरकारच्या निर्णयासंबंधीच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.   निवडणुकीची प्रक्रिया थांबवण्याचा न्यायालयाचा उद्देश नाही, मात्र आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जाता कामा नये, असं न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आजच्या सुनावणीत स्पष्ट केलं. या निवडणु...

November 9, 2025 5:46 PM November 9, 2025 5:46 PM

views 81

राज्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात

राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला उद्यापासून सुरुवात होणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घ्यायची शेवटी मुदत २१ नोव्हेंबर ही असून उमेदवारांची अंतिम यादी २६ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या निवडणुकीत एकंदर १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार, ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड करतील. निवडणुकीसाठीचं मतदान २ डिसेंबर रोजी, तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.  

November 28, 2024 1:40 PM November 28, 2024 1:40 PM

views 19

भाजपा पक्ष श्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक

महाराष्ट्रात अद्यापही सरकरस्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय झालेला नाही. यासंदर्भात आज नवी दिल्लीत महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.    दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व, अर्थात,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील, तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केलं.  सत्तास्था...