November 10, 2025 3:06 PM

views 23

फलटण इथल्या महिला डॉ. आत्महत्या प्रकरणी मुंबईत युवक काँग्रेसचं निदर्शन

सातारा जिल्ह्यात फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसने आज गिरगाव चौपाटी इथं निदर्शन केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदयभानू चिब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात  सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. युवक काँग्रेसनं  मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. आंदोलनकर्ते तिथं पोहोचण्याआधीच पोलिसांनी गिरगावात मोर्चा अडवला. 

February 25, 2025 2:52 PM

views 23

राज्यात काँग्रेसची सद्भावना यात्रा

राज्यात बंधुभाव आणि सामाजिक सौहार्द वाढीस लागावं यासाठी  काँग्रेसने सद्भावना यात्रेचं आयोजन केल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. ही यात्रा ८ मार्चपासून बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथून सुरू होईल. मुंबईत काँग्रेसच्या टिळक भवन मुख्यालयात ते काल वार्ताहरांशी बोलत होते.