December 5, 2024 8:26 AM
237
राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा आज शपथविधी
राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तसंच उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचा शपथविधीही होणार आहे. भाजपाच्या गाभा समितीच्या काल झालेल्या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. या प्रक्रियेसाठी मुख्य निरीक्षक म्हणून केंद्री...