March 6, 2025 1:31 PM March 6, 2025 1:31 PM

views 9

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं निदर्शन

विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निदर्शने केली. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह धनंजय मुंडे यांची छायाचित्रे झळकावून विरोधकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली तसंच कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस आल्याचा आरोप करत सरकारचा निषेध केला.

March 5, 2025 7:54 PM March 5, 2025 7:54 PM

views 11

छत्रपती संभाजी महाराजांना कैद झालेल्या सरदेसाई वाड्यात स्मारक उभारण्याची घोषणा

छत्रपती संभाजी महाराज यांना अटक झाली त्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.   रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडला असलेल्या राजमाता जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहीत करून त्या ठिकाणी शिवसृष्टी प्राधान्याने उभी केली जाईल, असं देखील मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देत...

March 3, 2025 3:04 PM March 3, 2025 3:04 PM

views 22

विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य सरकार कार्यरत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिभाषणात केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.    देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात राज्याचं १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती आहे, असं ते म्...