March 10, 2025 8:14 PM March 10, 2025 8:14 PM

views 15

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एकवीसशे रुपये देण्याचं नियोजन-मुख्यमंत्री

आगामी आर्थिक वर्षाचा एकूण ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. त्यात ५ लाख ६० हजार ९६४ कोटी रुपयांची महसुली जमा आणि ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे. यात ४५ हजार ८९१ कोटी  रुपये तूट अपेक्षित आहे. २०२५-२६ ची राजकोषीय तूट १ लाख ३६ हजार २३५ कोटी रुपये आहे. त्यामुळं राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरल्याचं अर्थमंत्री म्हणाले. तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या १ ...

March 10, 2025 8:08 PM March 10, 2025 8:08 PM

views 89

शेतकऱ्यांसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेची अर्थसंकल्पात घोषणा

बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते ही नवे योजना अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५० हजार शेतकऱ्यांच्या १ लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. कोकणातल्या उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे.  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ अर्थमंत्र्यांनी आज जा...

March 10, 2025 8:08 PM March 10, 2025 8:08 PM

views 14

उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि, सामाजिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात महत्वाच्या तरतुदी

उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि आणि संलग्न क्षेत्रे, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. त्यांचा हा ११ वा अर्थसंकल्प होता. राज्य सरकार लवकरच नवे औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, जलप्रवास, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर करणार असल्याची घोषणा यावेळी केली.    नव्या औद्योगिक धोरणातून ५ वर्षात ४० लाख कोटींची गुंतवणूक, ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवले आहे...

March 10, 2025 8:04 PM March 10, 2025 8:04 PM

views 7

जनता, शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची विरोधकांची टीका

महायुती सरकारने निवडणूक काळात दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अर्थसंकल्पात केली नाही.  या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने जनतेची फसवणूक केल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकरी आणि लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प असल्याचं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.    या अर्थसंकल्पात एसटी, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले असल्याची टीका माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली. शेतकरी कर्जमाफी, प्रध...

March 7, 2025 8:37 PM March 7, 2025 8:37 PM

views 20

ग्रामीण भागात सिमेंटचे रस्ते बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार नवी योजना आणणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते. स्मार्ट मीटर लावणाऱ्या घरगुती ग्राहकांना  दिवसा वापरलेल्या वीजेवर सवलत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली.    प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरातही सोलर पॅनल लावून देणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं बहुवार्षिक वीजदर याचिका सादर करत वीज दरात मोठी कपा...

March 7, 2025 9:03 PM March 7, 2025 9:03 PM

views 10

महिलांसाठीच्या योजनांची अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर आदिशक्ती समिती स्थापन होणार

राज्य शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव पातळीवर आदिशक्ती समिती या नावाने महिलांची एक विशेष समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा तसेच महिला दिनानिमित्त महिलांबाबतच्या विविध विषयांवरील विशेष चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महिला दिनाच्या निमित्ताने राज्यभर सर्व ग्रामपंचायती मध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून महिला दिन साजरा करण्याच्या सूचना देण्या...

March 7, 2025 1:04 PM March 7, 2025 1:04 PM

views 21

राज्याचा आर्थिक विकास दर ७.३ टक्के राहण्याची शक्यता

चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर ७ पूर्णांक ३ दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे. कृषी आणि निगडीत क्षेत्र ८ पूर्णांक ७ दशांश, सेवा क्षेत्र ७ पूर्णांक ८ दशांश आणि उद्योग क्षेत्र ४ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांनी वाढण्याची शक्यता राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज हा अहवाल मांडला. या आर्थिक वर्षात राज्याचे स्थूल उत्पन्न ४५ लाख ३१ हजार ५१८ कोटी रुपये राहण्याची शक्यता आहे. तर दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपयांवरून ११ टक्क्यांनी वाढून ३ ला...

March 6, 2025 8:27 PM March 6, 2025 8:27 PM

views 122

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५ आज विधानसभेत एकमताने मंजूर झालं. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं. या सुधारणेमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार आहेत. राज्यातील ४ हजार ८४९ एकर पडीक जमीन शेतकऱ्यांना मिळणार आहे. याचा लाभ छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे.   महाराष्ट्रात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाई...

March 6, 2025 5:20 PM March 6, 2025 5:20 PM

views 13

लाडकी बहीण योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी खबरदारी का घेतली नाही-नाना पटोले

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दहा लाख महिला अपात्र ठरणार आहेत, मग ही योजना राबवतानाच अपात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घेऊ नये याची खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारला. ते पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेत बोलत होते. या योजनेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाने जनतेला लुटलं आहे अशी टीका त्यांनी केली. सत्तेवर आल्यावर लाडकी बहीण योजनेद्वारे प्रतिमाह २१०० रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं, हे आश्वासन आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात पाळलं गेलं पाहिजे असं पटोले ...

March 6, 2025 3:33 PM March 6, 2025 3:33 PM

views 38

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भर्ती नाही – शालेय शिक्षणमंत्री

राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कोणतीही चुकीची भर्ती झालेली नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भर्ती करण्यात आलेल्या शिक्षकांच्या इतर माध्यमांच्या शाळेमध्ये नियुक्ती केल्याबाबतचा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस नायकवडी यांनी उपस्थित केला होता, त्याला भुसे यांनी उत्तर दिलं.   खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाचे थकीत ...