March 26, 2025 8:13 PM March 26, 2025 8:13 PM

views 12

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित, पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित आज झालं. पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू होणार आहे.   विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज केली. या पदासाठी बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता.    राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यातल्या ५० विकास योजना आणि पाच नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली.    दिवसभराच्या कामक...

March 25, 2025 7:06 PM March 25, 2025 7:06 PM

views 7

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा

विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं.  छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या कोरटकर याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.    सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात विसंगती आहे, व्हीसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा आहे, त्यामुळे या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाही सोडलं जाणार नाही, असं ते म्हणाले. &...

March 24, 2025 3:41 PM March 24, 2025 3:41 PM

views 12

विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी

अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.   विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये. या करता अशी नेमणूक करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा, असं वडेट्टीवार म्हणाले.  सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालणार तसंच नियमानुसार नियुक्त्या करण्यात येतील असं आश्वासन अध्यक्षांनी यावेळी दिलं.  

March 24, 2025 3:38 PM March 24, 2025 3:38 PM

views 13

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु

विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु झाली. राज्यात जाती धर्माच्या आधारे अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेला सुरुवात करताना केली. कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, याकडे सरकारनं लक्ष द्यावं, महाराष्ट्राला संपवू नये, असं ते म्हणाले. औरंगजेबाची कबर उखडून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नका. महाराजांच्या सोबत अनेक मुस्लिम मावळे काम करत होते हे लक्षात घ्या, या मु...

March 24, 2025 2:55 PM March 24, 2025 2:55 PM

views 11

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करण्याचा ठराव मंजूर

क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्रशासनाकडे करण्याचा ठराव आज महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर झाला. राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मांडलेला हा ठराव एकमताने मंजूर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारा ठरावही आज विधानसभेत मंजूर झाला.

March 24, 2025 1:47 PM March 24, 2025 1:47 PM

views 16

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदाची निवडणूक २६ मार्च रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत केली. यासाठी उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा सचिवांकडे अर्ज जमा करता येतील, असं त्यांनी सांगितले. २६ मार्चला सकाळी ११ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील.

March 19, 2025 7:14 PM March 19, 2025 7:14 PM

views 6

औषधांच्या तुटवड्याची माहिती घेण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देश

राज्यातल्या सर्व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांमध्ये  औषधांचा तुटवडा नेमका किती आहे याची माहिती घेण्यासाठी तीन आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिले. पुढच्या  पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यात यावा असंही त्यांनी सांगितलं.    अंबरनाथ, बदलापूर येथील बारवी धरणासाठी संपादित करायच्या वाढीव ६१ हेक्टर जमिनीची संपादन प्रक्रिया लवकर सुरू करून ती पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबतचा प्रश्न किसन कथोरे यांनी उ...

March 11, 2025 8:52 PM March 11, 2025 8:52 PM

views 9

राज्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू

राज्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे.    निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाने केवळ आकर्षक घोषणा करत आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत केली. राज्याची महसुली तूट ४५ हजार कोटींची आहे, एक लाख कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत, त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त बिघडली असल्याचं ते म्हणाले. हा अर्थसंकल्प राज्याला कर्...

March 10, 2025 8:18 PM March 10, 2025 8:18 PM

views 8

राज्याला विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प

आगामी वर्षाचा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि राज्याला विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाकडे घेऊन जाणारा, संतुलित असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू आहे, असं त्यांनी आज अर्थसंकल्पानंतर वार्ताहर परिषदेत जाहीर केलं.    राज्यात एक कोटी लखपती दीदी तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असंही ते म्हणाले.    या अर्थसंकल्पात कुठल्याही प्रकारे योजनांना कात्री लावलेल...

March 10, 2025 8:12 PM March 10, 2025 8:12 PM

views 7

व्यक्तीगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात १ टक्के वाढ

व्यक्तीगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात १ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केला. याशिवाय ३० लाखापेक्षा अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी त्यांनी प्रस्तावित केली.  बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एस्कॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना तसंच मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर ७ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला. विविध गोष्टींसाठी लागणारं मु...