March 21, 2025 2:57 PM March 21, 2025 2:57 PM

views 3

छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन शस्त्रक्रिया इमारत बांधण्यासाठी ७३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर

छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया इमारत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, यासाठी ७३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती, माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सभागृहाला दिली.   अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या खर्चात वाढ करण्यासाठी आदिवासी विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचं आश्वासन महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सभागृहाला दिलं. नागरी भागातल्या कुपो...

March 17, 2025 3:52 PM March 17, 2025 3:52 PM

views 8

बीड जिल्ह्यातल्या शिक्षक आत्महत्येप्रकरणी संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करण्याची विरोधी पक्षनेत्यांची मागणी

बीड जिल्ह्यातल्या केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, त्यामुळे संबंधित संस्थाचालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली. तसंच विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्थाचालकांना बंधनकारक करावं अशी सूचना केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं.   काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची मुगल शासक...

March 10, 2025 3:56 PM March 10, 2025 3:56 PM

views 72

राज्यासाठी नवे धोरण जाहीर करण्याची अर्थसंकल्पात घोषणा

राज्याचं नवीन औद्योगिक धोरण, कामगार धोरण, गृहनिर्माण धोरण तसंच आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरण लवकरच जाहीर करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. उद्योग, पायाभूत सुविधा, कृषि आणि संलग्न क्षेत्रे, सामाजिक तसंच इतर क्षेत्राच्या विकासासाठी महत्वाच्या तरतुदी करणारा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. यात त्यांनी नवीन औद्योगिक, कामगार, गृहनिर्माण, जलप्रवास, आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक धोरणाची घोषणा त्यांनी यावेळी केली...

March 10, 2025 3:43 PM March 10, 2025 3:43 PM

views 9

AI चा वापर करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा निर्णय

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५० हजार शेतकऱ्यांच्या १ लाख एकर क्षेत्राला लाभ देण्याचा निर्णय सरकारनं आज जाहीर केला. यासाठी येत्या २ वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची कामे पुढच्या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा - २ या योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ पवार यांनी आज जाहीर केली. या अंतर्गत सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत.  &nbsp...

March 10, 2025 3:53 PM March 10, 2025 3:53 PM

views 8

आगामी आर्थिक वर्षाचा ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

आगामी आर्थिक वर्षाचा एकूण ७ लाख २० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी आज सादर केला. त्यात ५ लाख ६० हजार ९६४ कोटी रुपयांची महसुली जमा आणि ६ लाख ६ हजार ८५५ कोटी रुपयांचा महसुली खर्च अपेक्षित आहे. यात ४५ हजार ८९१ कोटी  रुपये तूट अपेक्षित आहे.    २०२५-२६ ची राजकोषीय तूट १ लाख ३६ हजार २३५ कोटी रुपये आहे. त्यामुळं राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरल्याचं अर्थमंत्री म्हणाले. तसंच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या १ टक्...

March 10, 2025 4:01 PM March 10, 2025 4:01 PM

views 13

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२५   महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही - अर्थमंत्री अजित पवार   राज्याचं औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करणार असून ४० लाख कोटींची गुंतवणूक तर ५० लाख रोजगारनिर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.    नवीन कामगार संहितेनुसार नवे कामगार धोरण तयार करणार तसंच मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सध्याच्या १४० अब्ज डॉलरवरुन २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर आणि २०४७ पर्यंत दीड ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट - अर्थमंत्री अजित पवार   ५...

March 2, 2025 8:20 PM March 2, 2025 8:20 PM

views 9

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधकांनी बहिष्कार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद असावा, मात्र फक्त चहापानाला जाऊन संवाद होत नसतो, असं महाविकास आघाडीच्या वार्ताहर परिषदेत विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं.    सत्ताधारी विरोधकांना सापत्न वागणूक देत आहे, विरोधी पक्षातल्या लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रकाश कोरटकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्...

February 18, 2025 9:14 AM February 18, 2025 9:14 AM

views 6

येत्या ३ मार्चपासून राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ मार्चपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर राज्यपालांचं अभिभाषण होईल. १० मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील.