March 26, 2025 3:38 PM March 26, 2025 3:38 PM
1
महाराष्ट्रात ३० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ % कर लावण्याचा निर्णय मागे
राज्यात तीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला. त्यामुळे हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितलं. सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यां...