August 23, 2024 7:03 PM

views 25

बंदबाबत न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री

बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला राज्यव्यापी बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या  निर्णयाचा आदर राखून कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये बातमीदाराशी बोलताना त्यांनी सांगितलं, की बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, मात्र, त्यावर होत असलेलं राजकारण त्याही पेक्षा दुर्दैवी आहे.  नेपाळमधल्या बस दुर्घटनेत जळगावमधल्या नागरीकांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात नेपाळमध्ये आमदार आणि अधिकारी पाठवून तातड...

August 23, 2024 6:50 PM

views 32

महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई

बदलापूर इथल्या लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीला उद्या महाराष्ट्र बंद करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या पीठासमोर या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी पार पडली. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. या प्रकरणी न्यायालयानं महाविकास आघाडीचे घटक पक्ष, राज्य सरकार आणि गृ...

August 23, 2024 3:48 PM

views 33

महाविकास आघाडीनं पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन – उद्धव ठाकरे

बदलापूरमध्ये दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं उद्या पुकारलेला बंद हे विकृतीविरोधातलं आंदोलन असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळणार असून या बंददरम्यान रुग्णवाहिका, वृत्तपत्रं, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असंही त्यांनी सांगितलं.