July 31, 2025 7:20 PM July 31, 2025 7:20 PM
7
विधानसभा निवडणुकीत VVPAT आणि मतदान यंत्रातल्या मतांमध्ये तफावत आढळली नसल्याचा निर्वाळा
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित मतदार संघांमधल्या मतदान यंत्रांच्या चाचण्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र छेडछाडीपासून सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं, असं निवडणूक आयोगानं आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. याबाबत दहा उमेदवारांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी आठ अर्जदारांच्या उपस्थितीत चाचण्या घेण्यात आल्या....