October 23, 2024 6:59 PM

views 483

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे यांना रिंगणात उतरवलं आहे. ठाण्यातून राजन विचारे, दिंडोशीतून सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, तर वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असतील. गुहागरमधून भास्कर जाधव, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, कुडाळमधून वैभव नाईक, तर राजापूरमधून राजन साळवी निवडणूक लढवणार आहेत. नेवासामधून शंकरराव गडाख, बार्शीतून दिलीप सोपल, सावंतवाडीतून ...

October 23, 2024 6:53 PM

views 17

महायुती आणि मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात

विधानसभा निवडणुकीसाठीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप आज अंतिम होईल, असा विश्वास विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केला.    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ३८ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. छगन भुजबळ येवल्यातून, दिलीप वळसे पाटील आंबेगाव इथून, हसन मुश्रीफ कागलमधून,...

October 22, 2024 6:47 PM

views 48

काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल – बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडीत आता अवघ्या काही जागांबाबत सहमती व्हायची आहे, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसची पहिली यादी लवकरच जाहीर होईल, असंही ते म्हणाले.    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी आज अंतिम होईल, अशी माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर मतदारसंघासाठी एबी फॉर्म दिल्याची माहिती विद्यमान आमदार राजन साळवी यांनी दिली. 

October 22, 2024 7:24 PM

views 20

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला प्रारंभ

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करायला आजपासून सुरुवात झाली. विविध ठिकाणी उमेदवारी अर्ज घेऊन जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसून आली.     अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्यात अपक्षांचे ६ अर्ज दाखल झाले. यात फलटण विधानसभा मतदारसंघासाठी दोन,  कोरेगाव मतदार संघासाठी दोन, कराड उत्तर एक, सातारा मतदारसंघासाठी एक अर्ज दाखल झाला. परभणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल पाशा गफार खुरेशी यांनी उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार बा...

October 21, 2024 7:22 PM

views 47

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर झाली आहे. यात मुंबईतल्या ७ जागांचा समावेश आहे. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून परमेश्वर रणशूर, दिंडोशीतून राजेंद्र ससाणे, मालाडमधून अजय रोकडे, अंधेरी पूर्वमधून संजीव कुमार कलकोरी, घाटकोपर पश्चिममधून सागर गवई तर पूर्वेतून सुनीता गायकवाड आणि चेंबुरमधून आनंद जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याखेरीज ऐरोली, ओवळा माजिवडा, रिसोड, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापूर, बारामती, श्रीगोंदा आणि उदगीर मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे.  &nbsp...

October 21, 2024 7:20 PM

views 22

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीची १० उमेदवारांची यादी जाहीर

परिवर्तन महाशक्तीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी ८ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला आणि दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाकडून बच्चू कडू यांना अचलपूरमधून तर अनिल चौधरी यांना रावेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, राजुरामधून वामनराव चटप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.