October 24, 2024 7:12 PM

views 15

राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला राज्य सरकारनं सुटी जाहीर केली आहे. सर्व सरकारी, खासगी, औद्योगिक आस्थापनांना या दिवशी सुटी द्यावी लागेल आणि त्या दिवसाचं वेतन संबंधित कर्मचाऱ्याला द्यावं लागेल. अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान २ तास उशिरा येण्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी लागेल. या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.

October 24, 2024 7:01 PM

views 11

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांचा पक्षाचा राजीनामा, निवडणूक अपक्ष लढणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त व्हावा ही इथल्या नागरिकांची इच्छा आहे, त्यामुळे आपण इथून निवडणूक लढत आहोत असं भुजबळ म्हणाले. आपल्या भुमिकेमुळे महायुतीला अडचण होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

October 24, 2024 6:53 PM

views 17

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग

राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून, काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे.   महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, आंबेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला....

October 24, 2024 7:45 PM

views 26

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे इथे वार्ताहर परिषदेत ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळ इथून रोहित पाटील तर अहेरीमधून भाग्यश्री अत्राम निवडणूक लढवणार आहेत. घनसावंगीतून राजेश टोपे, काटोलमधून अनिल देशमुख, कोरेगावमधून शशिकांत शिंदे यांची नावं उमेदवार यादीत आहेत. मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड...

October 24, 2024 5:32 PM

views 20

स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर

विधानसभा निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. निवडणूक कार्यालयांच्या स्वीप पथकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  पथकांमार्फतही येत्या  20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात येत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्यानं, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.   विधानसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगानं विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई विद्यापीठानं पुढाकार घेत...

October 23, 2024 7:29 PM

views 23

काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके, येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर सुलभा खोडके यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

October 23, 2024 7:21 PM

views 16

भाजपा नेते लक्ष्मण ढोबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

माजी मंत्री, भाजपा नेते  लक्ष्मण ढोबळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. ढोबळे पक्षात आल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षबांधणीसाठी होईल, असं सुळे यावेळी म्हणाल्या. तर आपण अजित पवार यांच्याशी मतभेद झाल्याने पक्ष सोडला होता, आता ते या पक्षात नसल्याने पुन्हा पक्षाशी जोडले गेल्याचं ढोबळे यांनी सांगितलं. 

October 23, 2024 7:34 PM

views 26

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे उमेदवार अर्ज भरत आहेत.    मुंबईत मागाठाणे आणि जोगेश्वरी पूर्व अशा दोनच मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल झाले.    परभणी विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी ४ विधानसभा मतदार संघात ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.   जालना जिल्ह्यात आज तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.   लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मतदारसंघातून २ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातल्या लातूर शहर, ग्रामीण, निलंगा आणि औसा विधानसभा मतदारसंघातून अद्या...

October 23, 2024 7:15 PM

views 21

विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार

राज्यात संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूक लढणार असून पन्नासपेक्षा अधिक उमेदवार देणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आणि मुख्य प्रवक्ते डॉक्टर गंगाधर बनबरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान ४ ते ५ जागा देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आश्वासनानुसार जागा दिल्या नसल्याचा आरोप आखरे यांनी केला.

October 23, 2024 8:25 PM

views 12

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवणार

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप झालं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तिन्ही प्रमुख पक्ष प्रत्येकी ८५ जागा लढवतील, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली.    १८ जागा मित्र पक्षांना देण्यासंदर्भात उद्यापासून चर्चेला सुरुवात होईल, असंही राऊत यावेळी म्हणाले. या जागांवर मुख्य तीन पक्षांपैकी कुठल्याही पक्षाने दावा केल्यास तो प्रश्न चर्चेने सोडवला ज...