November 5, 2024 7:08 PM

views 17

राजकीय नेत्यांच्या राज्यात प्रचारसभा

विविध राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांना राज्यात सुरुवात झाली आहे. प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून आला.    उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं जनसंपर्क रॅली काढून प्रचाराचा प्रारंभ केला. आपल्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून मतदारच आपल्याला निवडून आणेल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत शि...

November 5, 2024 3:13 PM

views 77

मतदान केंद्रांची संख्या वाढवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

मतदान केंद्रांवरची गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात यावी, तसंच मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली आहे. पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. मतदान यंत्रांच्या बॅटरीवरून सुरू असलेला वाद थांबवण्यासाठी मतदान सुरू करताना आणि बंद होताना मतदान यंत्रांमधल्या बॅटरी किती चार्ज होत्या, याची नोंद ठे...

November 4, 2024 8:06 PM

views 13

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

राज्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चित्र आज स्पष्ट झालं. यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सुमारे ४ हजार १०० उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सुमारे ३ हजार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी बंडखोरी पूर्णपणे शमलेली नाही. गेल्या विधानसभा निवडणूक ३ हजार २७५ उमेदवार रिंगणात होते.    जागावाटपाबद्दल शेतकरी कामगार पक्षाशी चर्चा झाली असून उरणची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवेल, तर अलिबाग, पेण आणि पनवेलमधून शेकापचे उमेदवार न...

October 29, 2024 7:16 PM

views 16

शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शक्तिप्रदर्शन करत कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज भरला. संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून, भाजपाच्या हेमंत रासने यांनी पुण्याच्या कसबा पेठ मतदारसंघातून, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी वडगांव शेरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला.  काँग्रेसचे ग...

October 29, 2024 6:58 PM

views 20

अखेरच्या दिवशीही उमेदवार याद्या जाहीर

भारतीय जनता पक्षानं आज जाहीर केलेल्या यादीनुसार उमरेडमधून सुधीर पारवे, तर मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षानं माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील, मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शी मधून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत, मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात  आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपमधून आलेल्या तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.  दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुक प...

October 29, 2024 11:16 AM

views 20

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांनी काल आपापल्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. अनेक उमेदवारांनी यावेळी मिरवणूक काढत शक्तिप्रदर्शन केलं. 288 मतदारसंघांसाठी कालपर्यंत 3259 उमेदवारांचे 4426 अर्ज दाखल झाले आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.   मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर...

October 28, 2024 8:43 AM

views 12

अनेक मतदारसंघात पक्षांकडून उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा, अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस

राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत महायुतीकडून २३५ उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये भाजपचे १२१, शिवसेनेचे ६५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४९ उमेदवारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत २५९ उमेदवार घोषित झाले असून, यामध्ये काँग्रेसचे ९९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ८४, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ७६ उमेदवारांचा समावेश आहे....

October 25, 2024 7:09 PM

views 30

राज्यात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल

राज्यात आज दुसऱ्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरायला उमेदवारांची गर्दी दिसून आली.    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्याआधी त्यांनी संविधान चौक ते आकाशवाणी चौक रॅली काढली, तसंच त्यानंतर झालेल्या सभेला संबोधित केलं आणि पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास व्यक्त केला.    शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विधानसभा मतदार...

October 25, 2024 5:17 PM

views 16

काँग्रेस पक्षाची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेस पक्षानं ४८ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये कराड पश्चिम मतदार संघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साकोली इथून नाना पटोले, ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार, तिवसा - यशोमती ठाकूर, संगमनेर - बाळासाहेब थोरात तर पलूस इथून विश्वजीत कदम यांना    उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांना, लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख, हदगाव - माधवराव पाटील, भोकर - तिरुपती कोंडेकर, नायगाव - मिनल पाटील खतगावकर, पाथ्री - सुरेश वरपुडकर, तर फुलंब्री मतदारसंघातून विलास...

October 24, 2024 7:21 PM

views 13

विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली यादी जाहीर

बहुजन समाज पार्टी द्वारे आज विधानसभा निवडणुकीसाठी ६२ उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधून विजय वाघमारे, अकोला जिल्ह्यातील बाळापुर मधून भाग्यश्री गवई, अकोला पश्चिम मतदारसंघातून डॉक्टर धनंजय नालट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आणि नागपूर उत्तर मधून बुद्धम राऊत आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मधून सुभाष रणवीर यांना उमेदवारी दिली आहे.