November 11, 2024 7:29 PM

views 20

राज्यात मतदान जनजागृती कार्यक्रमाला सुरूवात

केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राज्यातील १४ जिल्ह्यात आजपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रमाला आज सुरुवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातही पथनाट्याद्वारे आज मतदार जनजागृती करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात आज स्वीप व्हॅनचा प्रारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातही मतदार जागृती यात्रेचा आज प्रारं...

November 11, 2024 7:44 PM

views 18

राहुल गांधी अपप्रचार करत असल्याची भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी अपप्रचार करत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाने आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. गांधी यांनी भाजपावर राज्यघटना नष्ट करत असल्याचा खोटा आरोप करत तणाव निर्माण केल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं असून आयोगाने यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या सभेदरम्यान राहुल गांधी यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन त्यांना आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अर्जु...

November 11, 2024 6:47 PM

views 26

विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली असून, विधानसभा निवडणुकीत विक्रमी यश मिळवू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते.    काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला धनुष्यबाण सोडवण्यासाठी आम्हाला उठाव करून सत्ताबदल करावा लागला, असं ते म्हणाले. लाडकी बहीण पुढचा हप्ता निवडणूक झाल्यावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं.    जालना जिल्ह्यात घनसावंगी इथ...

November 10, 2024 3:19 PM

views 23

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदार संख्येत ६,८७५ मतदारांची वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीला पुरवणी यादी जोडली आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्येत ६ हजार ८७५ मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ एकूण मतदार असून त्यात ४ हजार ७२ महिला मतदार तर २ हजार ८०१ पुरुष मतदार आणि दोन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

November 8, 2024 7:26 PM

views 8

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी गृहमतदानाला सुरुवात

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज गृहमतदान होत आहे. निवडणूक अधिकारी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन बॅलेट पेपरद्वारे मतदानाची प्रक्रिया राबवत आहेत. गृहमतदानासाठी रिसोड मतदारसंघात ५४६, वाशिम मतदारसंघात ४३२ तर कारंजा मतदारसंघात ४७९ मतदारांनी नोंद केली आहे.    सोलापूर जिल्ह्यातही आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली.  विविध तालुक्यात मिळून सुमारे ५ हजार ३१६ मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली आहे.   अमरावती जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासूून गृहमतदानाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्या...

November 8, 2024 9:54 AM

views 10

 निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आज दोन प्रचार सभा

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा आजपासून सुरू होणार आहे. येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं पंतप्रधानांच्या प्रचार सभा होणार आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात ते आज धुळे आणि नाशिक जिल्ह्यात प्रचार सभांना संबोधित करतील.   महाराष्ट्रातले मतदार महायुतीलाच निवडून देतील असा विश्वास त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आ...

November 7, 2024 7:07 PM

views 16

विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने प्रचार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोमाने सुरु आहे. राज्यातल्या दिग्गज नेत्यांसह इतर राज्यातल्या नेत्यांच्या देखील ठिकठिकाणी सभा होत आहेत. औरंगाबाद मध्य मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी आज मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघात पदयात्रा काढली. महायुतीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातले उमेदवार अतुल सावे यांनी आज लोकांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज कन्नड मतदारसंघाचे पक्षाचे उमेदवार अयाज मकबूल शहा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. शिवसेना उद्धव...

November 7, 2024 6:51 PM

views 11

आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्यात छापेमारी

निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाची राज्याच्या विविध भागात छापेमारी सुरु आहे.   उत्पादनशुल्क विभागानं धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत अवैध मद्यविक्री, वाहतूक प्रकरणी आतापर्यंत ७६ गुन्हे दाखल केले असून, ९३ लाख २ हजार ९७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.   ठाणे जिल्ह्यात घोडबंदर मार्गावर राज्य उत्पादनशुल्क विभागानं आज दुपारी केलेल्या कारवाईत गावठी दारूसह एकूण ३ लाख ३६ हजार १८०रुपयांचा मुद्देमाल जप्त केल...

November 5, 2024 7:05 PM

views 23

दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपदावर उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांची नियुक्ती

पुणे जिल्ह्यातल्या दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपदावर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याऐवजी उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यापूर्वी त्यांच्याशी पक्षपातीपणाने वागणे, निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवून शासनाचा महसूल बुडवणे अशा तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

November 5, 2024 7:01 PM

views 23

आचारसंहिता लागल्यापासून ४६ हजारांहून अधिक नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत एकंदर ४६ हजार ६३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या कालावधीत राज्यात २५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.    सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी निकाली काढण्यात आल्या. २८८ पैकी १८५ मतदारसंघांमध्ये एक, १०० मतदारसंघांमध्ये...